esakal | "मला बुधवार पेठेत कधी पाहिलं"; शिवीगाळ करणाऱ्याचा मानसी नाईकने घेतला समाचार

बोलून बातमी शोधा

Mansi Naik
"मला बुधवार पेठेत कधी पाहिलं"; शिवीगाळ करणाऱ्याचा मानसी नाईकने घेतला समाचार
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सेलिब्रिटींना चाहत्यांपर्यंत आणि चाहते सेलिब्रिटींपर्यंत सहज पोहोचण्यामागचं प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया. पण याच माध्यमात आता ट्रोलिंगचं प्रमाण खूप वाढलंय. या ट्रोलिंगचा सर्वाधिक सामना सेलिब्रिटींना करावा लागतो. एखाद्या पोस्टवरून, फोटोवरून किंवा मग त्यांच्या खासगी आयुष्यावरून सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं. अशावेळी काहीजण त्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात तर काहीजण त्यांना सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्री मानसी नाईकने नुकतंच एका ट्रोलरला इन्स्टा लाइव्हदरम्यान सडेतोड उत्तर दिलं आहे.

मानसीने एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. त्यात एका नेटकऱ्याने मानसीला 'तू बुधवार पेठेतली आहेस' असं म्हणत अर्वाच्च भाषेत कमेंट केली. संबंधित ट्रोलरला मानसीने त्याच लाइव्ह सेशनमध्ये खडसावलं. "तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठेतील स्त्रिया त्यांच्या पोटापाण्यासाठी तिथे काम करतात. ते त्यांच्या हिंमतीवर जगतात. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा काम करून खा. पण दुसऱ्यांना शिवीगाळ करून काय मिळतं?", अशा शब्दांत मानसीने सुनावलं.

हेही वाचा : दुसरं लग्न करणार का? मयुरी देशमुखचं विचारपूर्वक उत्तर

कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्यांना ट्रोल करणं, शिवीगाळ करणं, वाटेल ते बोलणं चुकीचं आहे, असं मत मानसीने मांडलं. मानसीने काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली. मानसीने या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.