esakal | चित्रपटसृष्टीलाही कोरोनाचा विळखा; 'या' कलाकारांना झाला संसर्ग...
sakal

बोलून बातमी शोधा

corona and film industry

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग कमालीचे त्रस्त आहे. कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. चित्रपटसृष्टीलाही कोरोनाने विळखा घातला आहे.

चित्रपटसृष्टीलाही कोरोनाचा विळखा; 'या' कलाकारांना झाला संसर्ग...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई :  गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग कमालीचे त्रस्त आहे. कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. चित्रपटसृष्टीलाही कोरोनाने विळखा घातला आहे. गायिका कनिका कपूर, बंगाली अभिनेत्री कोयल मल्लिक, अभिनेते किरण कुमार, गायक व संगीतकार मिलिंद इंगळे आदींना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानी त्यावर यशस्वी मात केली होती. 

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

आता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, अनुपम खेर यांची आई दुलारी तसेच करण जोहर, बोनी कपूर व आमीर खान यांच्या घरातील नोकरांना कोरोना झाला आणि त्यांनही मात केली आहे. केवळ भारातातीलच कलाकार आणि अन्य मंडळींना कोरोना झाला असे काही नाही तर परदेशी कलाकारांच्याही घरी कोरोनाने शिरकाव केला आहे. 

रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...

अभिनेत्री रिचेल व्हाईट, अमेरिकन गायिका व गीतकार मॅडोना, अभिनेत्री ओलिव्हिया निककने, गेम ऑफ थ्रोन्स फेम इंदिरा वर्मा, ग्रॅमी जिंकणारा अमेरिकन गायक जॉन प्रिन, हॉलीवुड अभिनेता टॉम हॅन्क्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन, युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल ओल्गा कुरिलेन्को यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही यावर मात केली आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image