... 'या' मराठी कलाकाराची तानाजी सिनेमात वर्णी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

काही दिवसांपूर्वी अजयने 'तानाजी'चा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर शेअर केला होता. आता अजिंक्य देव यांचीही सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे.

मुंबई : अभिनेता अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या 'तानाजी' या सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. अजय देवगण या सिनेमाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांचे शौर्य मोठ्या पडद्यावर दाखवणार आहे. 

आणखी एक मराठी नाव या सिनेमाशी जुळले आहे ते म्हणजे अभिनेते अजिंक्य देव. काही दिवसांपूर्वी अजयने 'तानाजी'चा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर शेअर केला होता. आता अजिंक्य देव यांचीही सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. ही भूमिका कोणती असेल हे अद्याप स्पष्टं झालेले नाही. सिनेमाच्या शूटींगबद्दल अजिंक्य यांनी ट्विट केले आहे. 

ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत असेल. सिंहगडाच्या लढ्यात तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. 'आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे', हे त्यांचे शब्द इतिहासात रोवले गेले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actor Ajinkya Deo Performed in Taanaji film as an important role