Shalva Kinjawadekar: ओमला मिळाली त्याची खरी स्वीटू, लवकरच करणार लग्न.. मेहंदीचे फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shalva kinjawadekar, shalva kinjawadekar wedding

Shalva Kinjawadekar: ओमला मिळाली त्याची खरी स्वीटू, लवकरच करणार लग्न.. मेहंदीचे फोटो व्हायरल

Shalva Kinjawadekar Wedding: येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओमकार या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शाल्व किंजवडेकर. मालिकेत स्वीटू सोबत ओंकारचं प्रेमप्रकरण सुरु असतं आणि नंतर दोघांचं लग्न होतं हे आपण पाहिलं.

आता ओंकारला त्याची रियल लाईफ स्वीटू मिळाली आहे. शाल्व त्याची गर्लफ्रेंड श्रेया दफलापुरकर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

(marathi actor shalva kinjawadekar get married soon with his girlfriend)

शाल्व आणि श्रेयाचे मेहंदीचे धम्माल फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाल्व आणि श्रेयाने खास पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आणि दोघांनी मेहेंदी सोहळ्यात धम्माल डान्स केला.

नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत शाल्व आणि श्रेयाचा मेहेंदी सोहळा रंगला. अशाप्रकारे शाल्व आणि श्रेया लवकरच लग्नबंधनात अडकणार असून दोघांच्या लग्नाची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे

शाल्व व श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रेया ही एक स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर आहे . तिने अनेक मराठी सेलिब्रिटींच्या लग्नात स्टायलिस्ट म्हणून काम केलंय. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात श्रेयाने स्टायलिस्ट म्हणून जबाबदारी पार पाडली होती. शाल्व आणि श्रेयाचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर दिसतात.

शाल्वने याआधी एक सांगायचंय, गोंद्या आला रे, बकेट लिस्ट अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर अशा वेबसिरीजमध्ये शाल्वने अभिनय केलाय. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत शाल्वने साकारलेली ओंकारची भूमिका तुफान लोकप्रिय झाली.

मालिकेतली ओंकार आणि स्वीटूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. शाल्व आणि श्रेया हे दोघे लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे

टॅग्स :Marathi Movies