esakal | De Dhakka 2: थांबायचं नाय, सिद्धार्थनं सांगितली रिलिज डेट
sakal

बोलून बातमी शोधा

De Dhakka 2: थांबायचं नाय, सिद्धार्थनं सांगितली रिलिज डेट

De Dhakka 2: थांबायचं नाय, सिद्धार्थनं सांगितली रिलिज डेट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्राला (entertainment) महाराष्ट्र शासनानं दिलासा दिला आहे. गेल्या दीड वर्षांपासून बंद असणारे चित्रपटगृहं आता पुढच्या महिन्यात सुरु कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिलासा मिळाला आहे. जेव्हा हा निर्णय जाहीर करण्यात आला त्यानंतर दोन दिवसांनी मराठी आणि हिंदी चित्रपट विश्वातील चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. बॉलीवूडमध्ये जरी मोठ्या प्रमाणात चित्रपटांची यादी असली तरी त्यात मराठी चित्रपटसृष्टीही काही मागे नाही. मराठीतील अनेक बिग बजेट मुव्ही आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहेत. तर काही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. यासगळ्यात प्रेक्षकांना उत्सुकता असणारा दे धक्काचा (de dhakka) दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी केले आहे.

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय दे धक्का हे गाणं प्रेक्षकांना आठवत असेल. दे धक्काच्या पहिल्या भागातील या गाण्याला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी वेगवेगळ्या पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरविण्यात आले होते. एका वेगळ्या प्रकारच्या कथेला दिग्दर्शकांनी पडद्यावर आणले होते. त्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटविश्वाला कोरोनानं घेरलं होतं. त्यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमोर संकट उभं होतं. आता थिएटर सुरु होणार या निर्णयानं त्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी थिएटर सुरु करा म्हणून अनेक कलाकारांनी शासनाकडे निवेदन देत मागणी केली होती. अखेर त्यांच्या त्या मागणीला शासनानं ग्रीन सिग्नल दिला आहे.

1 जानेवारी 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. धमाल विनोदीपट म्हणून प्रेक्षकांनी या चित्रपटाचे स्वागत केले होते. त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांचा अभिनय, त्यांचे संवाद हे सारं काही भन्नाट होतं. बॉक्स ऑफिसवरही दे धक्काच्या पहिल्या भागानं मोठी कमाई केली होती. त्यात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रेक्षकांना हा चित्रपट कमालीचा आवडला होता. आता त्याच्या दुसऱ्या भागाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. या चित्रपटातील प्रमुख अभिनेता सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावरुन चित्रपटाच्या रिलिजविषयी माहिती दिली आहे.

हेही वाचा: महेश मांजरेकर उलगडणार 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट'

हेही वाचा: खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं

loading image
go to top