महेश मांजरेकर उलगडणार 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट'

मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहे.
Swatantraveer Savarkar
Swatantraveer SavarkarTeam esakal

मुंबई - भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान असणा-या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट (biopic film on swatantraveer savarkar) आता बायोपिकच्या माध्यमातून समोर येणार आहे. मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहे. सावरकरांच्या जयंतीचे औचित्यसाधून बायोपिकच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. संदीप सिंग (Sandeep singh) हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या आधारे पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. (sandeep singh mahesh manjrekar make biopic film on swatantraveer savarkar)

'स्वातंत्र्यवीर सावरकर' (swatantraveer savarkar)असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे महेश मांजरेकर करणार आहेत. सावरकरांच्या १८८ व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करताना संदीप सिंह म्हणाले की, "वीर सावरकरांची जेवढी स्तुती केली जाते आणि तितकीच त्यांच्यावर टीकाही होते. सावरकरांकडे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जावे. त्यांचे विचार जोपासण्याची गरज आहे. नवीन पिढीला ते समजून सांगण्याची गरज आहे. सावरकर आणि त्यांचे कार्य याची ओळख नव्या पिढीला करुन देणे असा या चित्रपटामागील उद्देश आहे. सावरकरांचे योगदान कोणीही हे नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांसमोर आणला पाहिजे.

वीर सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होते. त्याबद्दल निर्माता अमित बी वाधवानी म्हणतात, "मी एक स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर प्रकाश टाकणारा चित्रपट तयार करत असल्याचा आनंद होतो आहे. वीर सावरकर हे भारतीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

Swatantraveer Savarkar
Video : मिलिंद सोमणने सेल्फीसाठी भररस्त्यात महिलेला काढायला लावले पुशअप्स
Swatantraveer Savarkar
'देवमाणूस'चा दोन तासांचा विशेष भाग; उलगडणार का मर्डर मिस्ट्री?

महेश मांजरेकर म्हणाले, "मला नेहमीच सावरकरांच्या विचारांचे आकर्षण वाटत आले आहे. त्यांचं आयुष्य प्रेरणादायी होतं. ते असे व्यक्तिमत्व होते की, त्यांना इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. असे वाटते. आता त्यांचे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं हे माझ्यासाठी आव्हान असणार आहे. पण मला हे आव्हान स्वीकारायचं आहे. या बायोपिकचे चित्रीकरण लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com