esakal | Manasi Naik | लग्नानंतर नऊ महिन्यांत मानसी नाईकने दिली 'गुड न्यूज'
sakal

बोलून बातमी शोधा

manasi naik

लग्नानंतर नऊ महिन्यांत मानसी नाईकने दिली 'गुड न्यूज'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री मानसी नाईकने Manasi Naik लग्नानंतर नऊ महिन्यांत 'गुड न्यूज' दिली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची गोड बातमी तिने चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये मानसीचा बेबी बंप पहायला मिळतोय. 'कमिंग सून' (coming soon) असा हॅशटॅग तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे. मानसीने जानेवारी महिन्यात प्रदीप खरेरा याच्याशी लग्नगाठ बांधली होती. प्रदीप हा बॉक्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे. (Manasi Naik Pregnant)

नोव्हेंबर २०२० मध्ये मानसी आणि प्रदीपने साखरपुडा केल्याचं जाहीर केलं होतं. साखरपुड्याच्या आधी काही महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. मानसी महाराष्ट्रीयन आहे तर प्रदीप हा हरियाणाचा आहे. हे दोघं त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारेही चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.

हेही वाचा: किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

हेही वाचा: मंदाकिनीसारखा अंघोळीचा सीन करणार का? ट्विंकलने दिलं सडेतोड उत्तर

मानसी नाईक तिच्या उत्तम नृत्यामुळे ओळखली जाते. 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही तिची गाणी तुफान गाजली होती. मानसी सोशल मिडियावरही तितकीच सक्रिय असते. टिकटॉकवर देखील वेगवेगळे व्हिडिओ करत तिने लाखो चाहत्यांना प्रेमात पाडलं होतं.

loading image
go to top