
Manasi Naik: मानसीनं गाण्यातुन सांगितली तिच्या मोडलेल्या लग्नाची कहानी? म्हणतेय, 'दिल टूटा हैं तो क्या….”
‘बघतोय रिक्षावाला’ ‘बाई वाड्यावर’ फेम मानसी नाईक सध्या चर्चेत आहे. मराठमोळी मानसी नाईकने अनेक हिट गाण्यांमुळे वेगळीच ओळख निर्माण केली. ती एक उत्तम नृत्यांगणा आहे त्याचबरोबर तिचा अभिनयही प्रेक्षकांना भुरळ घालतो.
गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयूष्यामूळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यातील नात्यांची परिस्थीती तर तिच्या चाहत्यांना माहितच आहे. मात्र ती यासर्व प्रकरणातुन आता बाहेर पडली आहे.
ती आता तिच्या कामाकडे वळाली आहे. ती सोशल मिडियावरही सक्रिय आहे. बऱ्याच दिवसांपुर्वी एका म्युजिक अल्बमधील हिंदी गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात मानसी दिसतेय. तर स्वरूप भालवणकर यांने हे गाणं गायल आहे.
या गाण्यात एका तरुणीची कथा सांगण्यात आली आह. जिला तिचा नवरा त्रास देतो. तिचा फक्त पैशांसाठी वापर करतो आणि नंतर ती त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेते. मानसीच्या खऱ्या आयूष्यातही असचं काहीसं चित्र पहायला मिळत असल्याने नेटकऱ्यांनी तिला हे गाणं तुझ्या आयूष्यावरच आहे ना असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला होता.
मानसीने याबद्दल बरेच दिवस मौन पाळले मात्र एका वृत्तसंस्थेशी बोलतांना ती म्हणाली, तिचा हा पहिला व्हिडिओ अल्बम आहे, मात्र हे गाणे तिच्या वास्तविक जीवनातून प्रेरित नाही. या गाणं सकारात्मक दृष्टीकोन देणारं आहे आणि हाच दृष्टिकोन तिच्या खऱ्या आयुष्यातदेखील आहे
मानसी नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मानसी मराठी मनोरंजन विश्वात नाव कमावल्यानंतर आता लवकरच हिंदी चित्रपट दिसणार आहे. तिने या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.