चुलीवर चपात्या बनवतेय मानसी नाईक; व्हिडीओ होतोय व्हायरल | Manasi Naik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manasi Naik

चुलीवर चपात्या बनवतेय मानसी नाईक; व्हिडीओ होतोय व्हायरल

'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक हिने तिच्या नृत्य कौशल्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मानसी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते . तिने काही महिन्यांपूर्वी प्रदीप खरेराशी लग्न केलं. मानसीने त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत पोस्ट करत असते. ती सध्या तिच्या सासरी फरीदाबादला गेली असून तिथल्या धमाल- मस्तीचे फोटो इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यातील एका व्हिडीओमध्ये ती चुलीवर चपात्या भाजताना दिसली.

मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वयंपाक करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मानसी चुलीवर चपात्या बनवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. मानसीचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडलेला आहे. तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव सुरू आहे. एकापेक्षा एक कमेंट करून चाहते तिचं कौतुक करत आहे. मानसीने हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं, 'भूख का रिश्ता सिर्फ़ रोटी से है, चमकती थालियाँ भूख नहीं मिटाती.' तिने पुढे लिहिलं, 'जेव्हा मी सासरी चुलीवरती चपात्या करायला शिकले'.

यावर एका चाहत्यानं म्हटलं की, 'खूपच छान, तुम्हाला कशाचं गर्व किंवा अभिमान नाही. तुम्हाला चुलीवरच्या चपात्या बनवताना खूप आश्चर्य वाटतंय.' आज कालच्या मुलींना तर ते पण करता येत नाही असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. 'खूपच छान ताई, आजकालच्या जमान्यात चुलीवर पदार्थ बनवणं कोणाला जमत पण नाही आणि तुम्ही एवढ्या चांगल्या चपात्या चुलीवर बनवल्या. आज कालच्या मुली तर नकाशे काढतात, म्हणून ऑप्शनला मॅगी बनवतात खरंच खूप छान वाटलं तुम्हाला जेवण बनवताना बघून', असंही एका युजरने लिहिलं.

हेही वाचा: 83 Teaser: 'त्या' झेलने रचला भारताचा इतिहास, टीझर पाहून अंगावर उभे राहतील रोमांच!

मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ यांमध्ये काम केलं आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच वेड लावलं होत. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

loading image
go to top