
भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासह इतर महिला कलाकारांची नावे घेतली होती. यानंतर आता प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. एका विधानानंतर पुराव्याशिवाय ज्या बातम्या झाल्या त्यावरही प्राजक्ता माळीने संताप व्यक्त केला. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी घेणार असल्याचं प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत सांगितलं.