
Prajakta Mali: प्राजक्ताला मिळाला युवा पुरस्कार, बोलताना शब्द सुचेना झाली भावूक..
मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर, निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिचा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. ती महाराष्ट्राची क्रश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
नुकतच प्राजक्ताने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातली एक महत्वाचा क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे. तिला सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'युवा पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आलं. याबद्दल पोस्ट शेअर करत तिने मान्यवरांचे आभार मानले आहे.

तिने तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, 'पुणे शहरात वाढले, सगळं शिक्षण पुण्यात झालं, पुणे विद्यापीठातून पदवीधर झाले…त्यामुळे घरातून शाबासकी मिळाल्याची भावना आहे… ह्यात “ललित कला केंद्र-गुरुकुल- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ”,
'माझे नृत्य गुरूद्वय- गुरू श्रीमती स्वातीताई दातार, गुरू श्री. परिमल फडके, माझं कुटूंब, माझी प्राथमिक शाळा - समर्थ विद्यालय, माध्यमिक शाळा - दामले प्रशाला-महाराष्ट्र मंडळ, पुणे शहर, प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, आतापर्यंत केलेल्या सगळ्या मालिका, चित्रपट, विशेषकरून महाराष्ट्राची हास्यजत्रा, Art of living foundation- श्री श्री रवीशंकरजी आणि “माझा अत्यंत प्रामाणिक असा प्रेक्षकवर्ग” ह्या सगळ्यांचा सहभाग आहे..'
पुढे ती म्हणते, 'विद्यापीठाचे, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे सर व परिमल सर ह्यांचे विशेष आभार… सरतेशेवटी.., माझ्याकडून तुमचं जास्तीक जास्त मनोरंजन होवो, तुमची सेवा घडो; हीच ईश्वराचरणी प्रार्थना.'

प्राजक्ताही महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ती कधी सोज्वळ पात्रात तर कधी खलनायिकाही भुमिकेत दिसते. त्याचबरोबर तिने अतिशय बोल्ड भूनिकाही चांगल्या प्रकारे साकारल्या आहे. काही दिवसांपुर्वीच तिला महाराष्ट्राची फेव्हरेट खलनायिका म्हणूनही पुरस्कार जिंकला आहे.