महिला दिनानिमित्त प्रार्थनाचं खास फोटोशूट; कष्टकरी महिलांना केला सलाम

prarthana
prarthana

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटचे फोटो ती सोशल मिडीयावर शेअर करते. नुकताच एका हटके फोटोशूटचे फोटो प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केले. कष्टकरी रणरागिनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे फोटोशूट प्रार्थनाने केले आहे. या फोटोंमध्ये ओझे वाहणारी, मासे विकणारी, शेतीची कामे करणाऱ्या महिलेचा लूक प्रार्थनाने केला आहे.

प्रार्थनाने हे फोटो शेअर करून कॅप्शन दिले की, 'संसार उभा करत देशाच्या अर्थव्यवस्थेला उभी करणारी नारी. जागतिक महिलादिनी आम्हाला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो. आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात, आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम.' 

सौ. माधुरी गायकवाड ,सौ. रत्ना वाघमारे,सौ. सुषमा माळी आणि सौ. ज्योती अडागळे या समाजातील कष्टकरी रणरागिनी  महिलांसारखा पोशाख परिधान करून त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती प्रार्थनाने दिली आहे. या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 

प्रार्थनाने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या चित्रपटामधून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मितवा, कॉफी आणि बरंच काही मस्का, मिसेस सदाचारी या चित्रपटांमधून प्रार्थनाने प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रार्थना लवकरच छूमंतर या नव्या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. प्रार्थनासोबतच सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना, रिंकू राजगुरू हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com