प्रिया बापटच्या गोड बातमीनं सगळे चक्रावले...

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

2020 मध्ये कोरोनाने दयनीय स्थिती निर्माण केली होती. त्यामुळे भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

मुंबई -अल्पावधीतच आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या प्रियानं केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही पदार्पण केले आहे. अनेक मालिकांमध्ये ती दिसून आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणा-या प्रियानं एक गोड बातमी सांगून सर्वांना चक्रावून टाकलं आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडिओही तिनं शेयर केला आहे.

दादा एक गुड न्यूज आहे या तिच्या नाटकाचा पुण्यातील प्रयोग हाऊसफुल झाला असल्याचे तिनं या व्हिडिओद्वारे सांगितले आहे. प्रियानं सोशल मीडियावर त्याचा  एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 2020 मध्ये कोरोनाने दयनीय स्थिती निर्माण केली होती. त्यामुळे भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे भारतातील सगळी नाट्यगृहं बंद करण्यात आली होती. पण आता नाट्यगृहं सुरू झाली असून नाटकांना प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. नाटकांना प्रेक्षक देत असलेल्या प्रतिसादामुळे प्रियाला खूप आनंद झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

गेल्या आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ मनोरंजन क्षेत्राला कोरोनाची मोठी झळ सोसावी लागली आहे. त्याचा परिणाम कलाकारांपासून बॅक स्टेज कर्मचा-यांवरही झाला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सरकारनंही सुरक्षित आरोग्याच्या कारणास्तव कोरोनाचे नियम पाळून चित्रिकरणाची परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ती परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्राला आलेली मरगळ लक्षात घेता स्थानिक प्रशासनानेही काही पावले उचलली आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियानं आपल्या नव्या व्हिडिओविषयी सांगितले आहे की, आमच्या नाटकाचे पुण्याचे बुकिंग सांभाळणाऱ्या मंडळींच्या हातून आम्ही हा हाऊसफुलचा बोर्ड लावत आहोत. तसेच तो बालगंधर्वच्या सगळ्या व्यवस्थापनाचे आभार मानताना दिसत आहे. प्रियाच्या या पोस्टवर या नाटकाचे फॅन्स आणि प्रियाच्या फॅन्सनी तिला खूप कमेंट्स दिल्या आहेत. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा पुण्यातील प्रयोग हाऊसफुल झाला असल्याचे ती या व्हिडिओद्वारे सांगत आहे.  मी सध्या बालगंधर्व नाटकाच्या परिसरात आहे. या व्हिडिओत आपल्याला हाऊसफुलचा बोर्ड दिसत असून या बोर्डवर हार घालताना मंडळी दिसत आहेत. आमचा आता प्रयोग असून आम्ही प्रयोगाच्या तयारीला जात आहोत. केवळ तुमच्यासोबत ही गुड न्यूज शेअर करायची होती असे ती सांगते. या व्हिडिओत प्रियासोबतच उमेश कामत, हृता दुर्गुले यांसारखे नाटकातील कलाकार देखील दिसत आहेत.

हे वाचा - भाजप नेत्यांचा 'तांडव' : सैफच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त

सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शिन केले आहे.नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे. बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रिया बापट, उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने ह्या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actress Priya Bapat share good news on social media