भाजपनेत्यांचा 'तांडव' : सैफच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त

वृत्तसंस्था
Monday, 18 January 2021

'तांडव' या वेब सिरीज मध्ये आता सैफ अली खान एका राजकारण्याची भुमिका साकारली आहे. या वेबसिरीजमधील एका भागामध्ये धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप सध्या होताना दिसून येतोय.

मुंबई - सॅक्रेड गेम्सच्या तुफान लोकप्रियतेनंतर सैफ अली खानने पुन्हा एकदा एमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. 'तांडव' या वेब सिरीज मध्ये आता सैफ अली खान एका राजकारण्याची भुमिका साकारली आहे. मात्र, त्याची ही वेबसिरीज आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमधील एका भागामध्ये धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप सध्या होताना दिसून येतोय. याबाबत भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी तांडव वेबसिरीजवर आक्षेप घेतला आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शक आणि निर्माते अली अब्बाज जफर यांच्यावर न्यायालयीन कारवाईची मागणी केली आहे आहे. या विषयी सोशल मीडियावर सैफ अली खानला खूप ट्रोल केलं जात आहे. या सर्व वादामुळे या वेब सिरीजमधील अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईमधील बांद्र्यातील घराला पोलीस संरक्षण दिले आहे.  त्याच्या घराबाहेर प्रशासकीय कर्मचार्‍यांसह पोलिस व्हॅनही तैनात केली आहे. 

'कंगणावर चोरीचा आरोप, 1950 च्या अगोदर कसला आला कॉपीराईट'

त्याचबरोबर, भाजपच्या मनोज कोटक आणि राम कदम यांनी तांडवच्या निर्मात्यांना ही वेबसिरीज ओटीटी प्लॅटफोर्मवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. मनोज कोटक यांनी पत्र लिहून माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना ही वेबसिरीज बॅन करण्याची मागणी केली आहे.

मोहम्मद झेशन आयुब हा अभिनेता स्टेजवर भगवान शिवच्या भूमिकेत दिसतो आणि स्वातंत्र्याविषयी बोलतो, असे या सिनमध्ये दाखवण्यात आले आहे. भगवान शिव आणि राम यांचे चुकीचे वर्णन या सिनमध्य़े केले आहे, असे विरोधकांचं मत आहे. 

बंडल 'तांडव', कथेवर नव्हे अभिनयावर तरलेला सत्तेचा 'नाटकी' पट 

दिल चाहता है, कल हो ना हो, लव्ह आज कल, ओंमकारा, लाल कप्तान या चित्रपटांमधून सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच त्याच्या 'सॅक्रेड गेम्स' या वेब सिरीज मधील अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती. ज्यांनी तांडव ही वेबसिरीज पाहिली आहे, त्या त्याच्या चाहत्यांनी सैफच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Protection at Saif Ali Khan saif Ali Khan latest release Tandav