स्मिता गोंदकरचा चित्तथरारक बाईक स्टंट; नेटकरी थक्क!

smita gondkar
smita gondkar

बिग बॉस सिझन 1 मधील सर्वात बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिताला स्टंट आणि अॅडव्हेचरची खूप आवड आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या स्टंटचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी स्मिताने घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. आता स्मिताचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

स्मिता लवकरच एका पुरस्कार सोहळ्यात स्पेशल परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. या परफॉर्मन्ससाठी स्मिता खास तयारी करत आहे. या पुरस्कार सोहळ्यात स्मिताची एन्ट्री बाईकवर होणार आहे. एवढंच नाही तर बाईकवरून एन्ट्री घेत स्मिता काच फोडते असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्मिताच्या या स्पेशल परफॉर्मन्सची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

याआधी स्मिताने घोडेस्वारीचा  व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हा स्मिताने घोड्यासोबत एक खास फोटोशूट केले होते. या फोटोशूटसाठी स्मिताने  लाल रंगाची नऊवारी नेसली होती. या फोटोशूटला स्मिताच्या चाहत्यांनी पसंती दिली. तेव्हा अनेकांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या.' पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे स्मिताला विशेष लोकप्रियता मिळाली. 'मुंबईचा डबेवाला'या चित्रपटात स्मिताने काम केले. त्यानंतर बिग बॉस सिझन 1 मध्ये ती स्पर्धक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com