मराठमोळी अप्सरा करतेय परदेशात वेकेशन एन्जॉय, पाहा फोटो

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

मराठीतील 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णीनेही तिच्या प्रेमाचा खुलासा केला. आता सोनाली परदेशात वेकेशन एन्जॉय करत आहे. पाहा तिचे काही सुंदर फोटो !

मुंबई : फेब्रुवारी महिना उजाडला आहे. फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना कारण, या महिन्यात येतो 'व्हॅलेनटाइन डे'. त्यामुळे फ्रेब्रुवारीला 'व्हॅलेनटाइन मंथ' म्हणूनही ओळखले जाते. बॉलिवूड असो या मराठी कलाकार त्यांच्या लव्ह लाइफविषयी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये कायम असते. आवडते सेलिब्रिटी नक्की कोणाच्या प्रेमात आहेत, त्यांच्या लव्ह लाइफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. मराठीतील 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णीनेही तिच्या प्रेमाचा खुलासा केला. आता सोनाली परदेशात वेकेशन एन्जॉय करत आहे. पाहा तिचे काही सुंदर फोटो !

नोरा फतेही कधीकाळी विकायची लॉटरी, आता आहे बॉलिवूडची डान्स क्वीन

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sun and sand!  #sonaleekulkarni #dubai #desertsafari

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील एक टॉपची सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटासह अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण, 'नटरंग' या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळाली. जवळपास 12 वर्षे सोनाली अभिनय क्षेत्रात काम करतेय आणि एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे ती करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Dream catcher! #sonaleekulkarni #dubai #nikkibeach

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

या सुंदरीने नुकताच तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण त्याच पार्टनरसोबत ती दुबईमध्ये वेकेशन एन्जॉय करत असल्याची चर्चा सुरु आहे. दुबईमध्ये फिरतानाचे काही सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. वाळवंटातील तर काही खाण्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. तिच्या या दुबईमधील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. 

नालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने बॉयफ्रेंडला टॅग करत 'my partner' अर्थात जोडीदार असं लिहिलं आहे. काही इतर सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून यावर्षी ते दोघं लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The last sunset!

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

माझ्या पार्टनरसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय असं सोनालीने त्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ज्या पार्टनरला तिने टॅग केलं आहे तो  कुणाल बेनोडेकर आहे. सोनाली कुणालसोबत सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोनाली इन्स्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते.

'जिम लुकसाठी नाही तर, अभिनयासाठी ओळखा', जान्हवी झाली नाराज !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित 'हिरकणी' या चित्रपटातून तिने हिरकणीची भूमिका साकारली. या चित्रपटाने हिंदी चित्रपटांना टक्कर देत चांगलीच कमाई केली. नुकताच 'धुरळा' या मराठी चित्रपटा रिलिज झाला आणि सोनाली त्यातून एका जबरदस्त भूमिकेत दिसली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actress sonalee kulkarni enjoying vacation in Dubai