अग्गंबाई सासूबाई मधल्या शुभ्राची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पहिल्याच सिनेमात दिला बोल्ड सिन

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

तेजश्रीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. 

मुंबई : मराठीमधील अनेक कलाकार उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतात. मराठी मालिकांमधून सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री मराठी सिनेमांतून आणि नाटकांमधूनही झळकली. तरीही तिच्या सूनेच्या भूमिकेला सर्वाधिक प्रेम मिळाले आहे. तेजश्रीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. 

ऑस्कर विजेत्या 'पॅरासाइट' ने चोरली तमिळच्या 'या' सिनेमाची कथा ?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

शुभ दीपावली #HappyLife @zeemarathiofficial @aggabaisasubai

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

तेजश्रीने 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून लोकांच्या मनात घर केले. या मालिकेत तेजश्रीनं जान्हवी नावाच्या सोशिक आणि समंजस तरुणीची भूमिका साकारली होती.त्यानंतर आता ती झी मराठीच्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत शुभ्राची भूमिका साकारत आहे. या मालिकेला थोड्या कालावधीतच लोकांचे प्रेम मिळाले. यामधील शुभ्राच्या व्यक्तीरेखेलाही लोकांनी पसंती दिली. तेजश्री लवकरच 'बबलू बॅचलर' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच 'बबलू बॅचलर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये तेजश्रीने शर्मनसोबत किसिंग सीन दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्य़े सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळते आहे. 

अग्निदेव चॅटर्जी यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 'बबलू बॅचलर' हा कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा बबलू उर्फ शर्मनच्या लग्नाभोवती फिरताना दिसते. बबलू सुरुवातीला लग्न करण्यास नकार देतो. पण नंतर वडिलांच्या आग्रहामुळे लग्नासाठी मूली पाहण्यास सुरुवात करतो. तसेच चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बबलूसोबत दोन वधू दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कॉमेडी चित्रपटात काही तरी सस्पेंस असणार आहे. यामध्ये तेजश्रीने दिलेल्या किसिंग सिनची चर्चा सुरु आहे. पहिल्याच बॉलिवूड सिनेमात तिने दिलेल्या बोल्ड सिनमुळे तिला अनेकांनी टोला लगावला आहे. तर, अनेकांनी बॉलिवूडमध्ये  एन्ट्री केल्यामुळे तिचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#babloobachelor 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

तेजश्री आणि शर्मन यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात पूजा चोप्रा, राजेश शर्मा आणि मनोज जोशी यांच्यांही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अग्नीदेव चटर्जी यांनी केलं आहे. हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'घटस्फोटातून मी अजुनही सावरत आहे' दिया मिर्जाचा पहिल्यांदाच खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Daily Affirmation : "I have a healthy body, A tranquil Mind and a vibrant soul" #HappyLife

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actress tejashri pradhan first Hindi movie with sharman joshi