ऑस्कर विजेत्या 'पॅरासाइट' ने चोरली तमिळच्या 'या' सिनेमाची कथा ?

Parasite Is A Copy Of The 1999 Tamil Film Minsara Kanna says Twitter
Parasite Is A Copy Of The 1999 Tamil Film Minsara Kanna says Twitter

मुंबई : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य सोहळा (ता. १०) लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्करचे यंदाचे ९२वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट' चित्रपटाने यंदाच्या ऑस्करवर आपली मोहोर उमटवली, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार  'जोकर'फेम हॉकिन फिनिक्सला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी जेल्वेगरला जुडी या चित्रपटासाठी मिळाला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पॅरासईट चित्रपटाचे दिग्दर्शक बाँग जून हो यांना पुरस्कार मिळाला. पण, ऑस्करवर नाव कोरणाऱ्या या सिनेमाची कथा चोरीची असल्याचा दावा केला जात आहे. 

'पॅरासाइट' या चित्रपटाला बेस्ट चित्रपट, बेस्ट दिग्दर्शन, बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट स्क्रीनप्ले या चार पुरस्कांनी गौरवण्यात आले. पण या चित्रपटाची कथा तामिळ अभिनेता विजयच्या चित्रपटातून चोरल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे. तमिळ अभिनेता विजयच्या 'मिनसारा कन्ना' या सिनेमाची कथा मिळती जुळती असल्याचं बोललं जात आहे. विजयचा हा सिनेमा 1999 ला प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटात मोनिका कास्चेलिनो, रम्भा आणि खुशबू सुंदर हे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात कन्नन (विजय) इश्वर्याच्या (मोनिका कास्टेनिया) प्रेमात पडतो. पण इश्वर्या एका श्रीमंत घरातील मुलगी असते. कन्नन त्याची ओळख लपवून तिच्या कुटुंबामध्ये बॉडीगार्डचे काम करु लागतो. त्यानंतर कन्ननचा छोटा भाऊ त्याच घरात नोकराचे काम करतो आणि त्याची बहिण कुकचे काम करत असते. त्यामुळे एकाच गरीब कुटुंबातील तीन व्यक्ती एकाच श्रीमंत घरात काम करु लागतात.

काय आहे 'पॅरासाइट' ची कथा ?
'पॅरासाईट' या चित्रपटात एका गरीब कुटुंबामधील सदस्य श्रीमंत घरामध्ये पैसे कमावण्यासाठी काम करत असतात. शिवाय या श्रीमंत घरातील लोकांना त्यांच्याकडे काम करणारे सर्वच लोक एका कुटुंबातील आहेत हे माहिती नसते.

काय आहे सत्य ?

याचवरुन तमिळ सिनेमा 'मिनसारा कन्ना' ची कथा 'पॅरासाईट'ने चोरल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. ट्विटरवरुन काही युजरर्संनी त्याचा आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरी मात्र दोन्ही चित्रपटाची कथा हि वेगळी आहे. कारण, 'मिनसारा कन्ना' या सिनेमामध्ये एका श्रीमंत घराण्यातील मुलगी आणि गरीब कुटुंबातील मुलगा यांची प्रेम कथा दाखवण्यात आली आहे. तर 'पॅरासाइट' मध्ये श्रीमंत आणि गरीब कुटुंबातील दरी दाखवण्यात आली आहे. तसेच गरीब कुटुंबावर ओढवणाऱ्या परिस्थिती चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com