'पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम' बस्स! : आणखी काय हवं...

अभिनेत्री त्रिशला शहा जशी तिच्या हटके लूकसाठी प्रसिद्ध आहे तशी ती तिच्या फूडीपणासाठही ओळखली जाते.
'पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम' बस्स! : आणखी काय हवं...

अभिनेत्री त्रिशला शहा जशी तिच्या हटके लूकसाठी प्रसिद्ध आहे तशी ती तिच्या फूडीपणासाठही ओळखली जाते. तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिनं आपल्या वेगवेगळ्या फुडीपणाविषयी सांगितलं. त्यात तिनं आपल्याला काय आवडतं, त्याची खासियत काय यासगळ्याच्या आठवणी शेयर केल्या आहेत. तिनं काय सांगितलंय हे आपण जाणून घेऊयात.

महाबळेश्वर हे माझे आवडते पर्यटनस्थळ आहे. तिथे असलेले मॅप्रो गार्डन्स तर बऱ्याच जणांच्या परिचयाचे असावे. पुण्याहून अगदी चार तासाच्या अंतरावर असल्यामुळे तिथे बऱ्याचदा जाणे होते. दोन दिवस तेथ हॉटेलमध्ये राहून माघारी येताना अगदी आवर्जून तिथे थांबतो ते तेथील पिझ्झा आणि त्यासोबत स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायला. खूप वर्षांपासून मॅप्रोचा पिझ्झा खाते, पण अजूनही त्याची चव तीच आहे.

अलीकडेच लॉकडाऊनमध्ये मी बेकिंग शिकले. बेकरीच्या पदार्थांबरोबर आता मला पिझ्झा बेसही बनवता येतो. त्यात हवे ते पदार्थ वापरून मस्त पिझ्झा बनवून घरच्यांना खायला घालते. माझे आई आणि वडील मी बनविलेला पिझ्झा अगदी आवडीने खातात. माझा लहान भाऊ ईशान तर लगेच त्याच्या मित्रांनाही बोलावून घेतो पिझ्झा पार्टीसाठी. कामाच्या व्यापातून हल्ली महाबळेश्वरला जाणे फारसे होत नाही, याची खंत आहे. पण, मॅप्रोच्या पिझ्झाची ती चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. पावसात भिजत महाबळेश्वरमधील आठवणींना उराशी कवटाळून तो पिझ्झा खाणे आणि त्याची मज्जाच काही वेगळी आहे.

'पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम' बस्स! : आणखी काय हवं...
राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: पत्नी शिल्पा शेट्टी साक्षीदार
'पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम' बस्स! : आणखी काय हवं...
'KRK' च्या याचिकेवर सलमान खानने खुलासा करावा - उच्च न्यायालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com