Urmila Kothare: सायबर क्राईमपासून थोडक्यात बचावली उर्मिला; अनुभव शेअर करत म्हणाली.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urmila Kothare: सायबर क्राईमपासून थोडक्यात बचावली उर्मिला; अनुभव शेअर करत म्हणाली....

Urmila Kothare: सायबर क्राईमपासून थोडक्यात बचावली उर्मिला; अनुभव शेअर करत म्हणाली....

Urmilla Kothare : आपला देश देश डिजीटल यूगात क्रांती करु पाहतोय. सर्वत्र डिजीटल व्यवहार व्यवहाराचा वापर होतं आहे. एकीकडे याचा खूप फायदा होत आहे. व्यवहार लवकरात लवकर होण्यास मदत होत आहे मात्र दुसरीकडे या व्यवहारामुळे सायबर गुन्हेगारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरदरोजच अशा अनेक बातम्या आपल्या कानावर पडतात. सुरक्षित व्यवहार करत असतांनाही नकळत अशा काही चुका होतात की त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

यासामान्य नागरिकच नाही तर मोठ्या सेलिब्रिटीही यातून सुटलेले नाहीत आता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्मिला कोठारे हीदेखील सायबर क्राइमची शिकार होता होता थोडक्यात वाचली आहे.

सायबर क्राइमची शिकार होता होता ती वाचल्यानंतर तिने लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. याबाबत सांगतांना तिने फ्रॉड मेसेजचा एक स्क्रीनशॉट केला शेअर केला आहे. हा मेसेज एका बॅकेच्या नावाने तिला आला आहे. त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे,"तुम्ही एचडीएफसी बॅंकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. यामुळे तुमचं खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा." स्क्रीनशॉट शेअर करत उर्मिलाने लिहिलं आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हा मेसेजवर चा स्क्रीनशॉट टाकत तिने म्हटंलय "मला आताच असा एक मेसेज आला आहे. अनेकदा असा मेसेज वाचल्यानंतर लोक पॅनिक होतात आणि अशा लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या खासगी गोष्टींची माहिती फ्रॉड लोकांकडे जाते. त्यामुळे तुमचं बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकतं. मला आलेल्या मेसेजमधली लिंक मी पाहिली पण त्याच एचडीएफसी बॅंकेचे पूर्ण नाव लिहिण्यात आले नव्हते. त्यामुळे मला शंका आली. मित्रांनो माफ करा. माफ करा आज तुमचे नशिब जरा कमजोर आहे".

हेही वाचा: Big Boss 16: बिग बॉसने स्वत:च्या फायद्यासाठी नियम ठेवले धाब्यावर? अर्चनाच्या एंन्ट्री...

उर्मिलानं हा फ्रॉड मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत तिच्या चाहत्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मोबाईलवर येणाऱ्या लिंकची आधी माहिती घ्या. पॅनिक न होता शांततेत ते पुन्हा वाचा त्यानंतरच क्लिक करा असं आवाहनदेखील केलं आहे. स्कॅम अर्लट म्हणत तिने ही माहिती दिली आहे. उर्मिला ही तिच्या सावधगिरीच्या भूमिकेमुळे या प्रकरणातुन ती वाचली मात्र लोक धकाधकीच्या आयूष्यात अनेक चुका होतात. त्याचा चांगलाच फटका बसू शकतो. त्यामुळे सावधान रहा.