मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव झळकणार स्पॅनिश चित्रपटात...

संतोष भिंगार्डे
Monday, 20 July 2020

या सिनेमाचं शूटिंग स्पेनमधील फ्युएन्टेस डी एब्रो येथे पार पडणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : 'ट्रॅफीक सिग्नल'पासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री उषा जाधव एकेक पाऊल पुढे टाकीत आहे. 'धग' या चित्रपटाला तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच. शिवाय 'माईघाट..क्राईम नंबर 103-2015' या मराठी चित्रपटासाठी गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 

मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

आता ही मराठमोळी अभिनेत्री हिंदी व मराठी बरोबरच स्पॅनिश चित्रपटात काम करीत आहे. 'ला न्यूवा नॉर्मालिदाड' असे त्या स्पॅनिश चित्रपटाचे नाव आहे. अलेजान्ड्रो कॉर्टीस हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि अ‍ॅरॅगेन टीव्ही या चित्रपटाची निर्मिनी करत आहे. दिग्दर्शक अलेजान्ड्रो कॉर्टीस नेहमीच एखादी सामाजिक समस्या चित्रपटाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडतात. हा चित्रपट या कोरोना काळात झालेल्या वर्णद्वेषावर केंद्रित आहे. 

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती

या सिनेमाचं शूटिंग स्पेनमधील फ्युएन्टेस डी एब्रो येथे पार पडणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल बोलताना उषा जाधव म्हणाली की, "मी आत्ता या सिनेमाबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल काहीच सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पहावी लागेल. पण एवढे नक्की सांगू शकते की या चित्रपटातील भूमिका नावीन्यपूर्ण आहे."
----
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress usha jadhav will be part part of spanish film