Happy Birthday Uday Chopra : ...यामुळे उदय राहिलाय ऍक्टिंगपासून दूर!

टीम ई-सकाळ
रविवार, 5 जानेवारी 2020

शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मोहब्बते' या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Happy Birthday Uday Chopra : रोमँटिक चित्रपटाची निर्मिती करणारे दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा आपणा सगळ्यांनाच माहित आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीला असलेल्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना यश चोप्रांनी ओळख मिळवून दिली. यश चोप्रांमुळे यशराज बॅनर हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा बॅनर बनला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यश चोप्रांचा हा वारसा त्यांचा मोठा मुलगा उदय चोप्रा याने पुढे चालवला आहे. मात्र, त्यांच्या धाकट्या मुलाच्या वाट्याला तेवढ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नाही. इतक्या मोठ्या आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबात जन्माला येऊनही तो कायम अपयशाच्या गर्तेतच राहिला. तो शापित राजहंस म्हणजे उदय चोप्रा होय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This is a 14yr old picture of me

A post shared by Uday Chopra (@udayc) on

दिग्दर्शक यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा असलेल्या उदय चोप्राने लहानपणापासूनच आपल्या कुटुंबाच्या व्यवसायातच हातभार लावण्यास सुरवात केली होती. पुढे अभिनय क्षेत्रात नशिब आजमावताना काही चित्रपटांत अभिनय केला. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मोहब्बते' या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याच्या अभिनयाला कुणाची दाद मिळाली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

One of my fav pics from "Supari" shoot. Taken by Padam Kumar

A post shared by Uday Chopra (@udayc) on

त्यानंतर त्याने मेरे यार की शादी है, चरस, धूम, नील ऍण्ड निक्की, धूम-2, धूम-3 मध्ये अभिनय केला. मात्र, त्याच्या भूमिकेची तितकी चर्चा झाली नाही. 'धूम' सीरिज वगळता त्याच्या वाट्याला चांगल्या भूमिका आल्या नाहीत. 'धूम'मध्येही तो अभिषेक बच्चनसह पोलिसाच्या छोटेखानी-विनोदी भूमिका साकारताना दिसला. 
    
ऍक्टिंग क्षेत्राप्रमाणेच लव्ह लाईफमध्येही त्याची होडी हेलकावे खात होती. बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि उदय हे एकमेकांना खूप दिवस डेट करत होते. त्यानंतर ते लग्न करणार असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. मात्र, 2016 मध्ये नर्गिससोबत ब्रेकअप झाल्यानंतर उदय नैराश्याच्या गर्तेत अडकला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Remembering my Jack Sparrow days #Dhoom3

A post shared by Uday Chopra (@udayc) on

2014 मध्ये यश राज बॅनरने 'द लाँगेस्ट वीक' या हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती केली होती. आणि यशराज बॅनरचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट ठरला. याचे सर्व श्रेय उदयला जाते. मात्र, या चित्रपटालाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे निराश झालेल्या उदयने बॉलिवूडमधून जवळपास संन्यासच घेतला. 

त्यानंतर उदय अधूनमधून ट्विटरवर काही ट्विट करत होता. आत्महत्या करण्याबाबत आणि देशात गांजा विक्री कायदेशीर करण्याबाबत त्याने केलेल्या ट्विटमुळे अनेक वाद निर्माण झाले होते. 

मात्र, नेटकऱ्यांनीही त्याची टर उडवल्याने त्याची निराशा काही कमी झाली नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यश चोप्रांनी उदयला गिफ्ट केलेला हॉलिवूड हिल्समधील व्हिला विकावा लागला. कर्जाच्या खाईत चाललेल्या उदयने लॉस एंजेलिसमध्ये असलेला हा व्हिला 25.3 कोटी रुपयांना विकला. अभिनय, निर्मिती आणि एकूणच व्यावसायिक क्षेत्रात आलेले अपयश आणि नर्गिस सोबत झालेला ब्रेकअप उदयला नैराश्याच्या गर्तेत ढकलत गेला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Need to be Superman!

A post shared by Uday Chopra (@udayc) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi article about Yash Chopra son and Bollywood Actor Uday Chopra