आविष्कार दारव्हेकर विरोधात खळबळजनक पोस्ट, लग्न करुन फसवल्याचा गंभीर आरोप

आविष्कार दारव्हेकरनं आपल्याला घटस्फोट न देता तिसरं लग्न केल्याचा दावा स्मिता सावंत महिलेने केला आहे. सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल होत आहे.
Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral
Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viralGoogle

Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar: अनेक वर्षापूर्वी मराठी मालिकाविश्वात 'आभाळमाया' या मालिकेनं राज्य केलं होतं. केवळ मालिकाच नाही तर यातील प्रत्येक पात्र घराघरात प्रसिद्ध झालं होतं. अभिनेता अविष्कार दारव्हेकर हा त्या प्रसिद्ध झालेल्या कलाकारांपैकीच एक. आभाळमायानंतर आविष्कारनं अनेक मालिका, सिनेमांतून काम केलं खरं पण हवं तसं यश त्याला मिळालं नाही. आणि चांगला कलाकार असूनही त्याचं करिअर फार काही घडू शकलं नाही. पुढे तो चर्चेत आला ते अभिनेत्री स्नेहा वाघशी केलेलं लग्न आणि त्यानंतर त्यांच्या घटस्फोटामुळे. त्यातही स्नेहानं त्याच्यावर लावलेला कौटुंबिक अत्याचाराचा गंभीर आरोप यानं त्याच्या नावाची वादग्रस्त चर्चा अधिक झाली.(Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral)

Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral
'ऊरफाटेस्तोवर...'; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

त्यानंतर तब्बल ३-४ वर्ष आविष्कार अभिनयसृष्टीपासून दूरच राहिला. तो अनेक व्यसनांच्या गर्तेत अडकलाय अशा देखील चर्चा रंगू लागल्या. पुढे तो अचानक दिसला ते मराठी बिग बॉसमध्ये. आणि चक्क यावेळी स्नेहा वाघ त्याची पूर्वाश्रमीची पत्नी देखील सामिल झालेली बिग बॉसमध्ये. मग काय, शो ने देखील दोघांमधील संभाषणांवर, आरोप-प्रत्यारोपांवर चांगलाच टीआरपी काढला. स्नेहाने भर टेलीव्हिजनवर सगळ्यांसमोर आविष्कार आपला कसा छळ करायचा याचे पाढेच वाचून दाखवले होते. असो ते सगळं देखील पार पडलं. आविष्कार हळूहळू चर्चेत येऊ लागला. त्यानं कामही करणं सुरु केलं. एवढ्यात त्याच्या कामाची नाही तर त्यानं दुसरं लग्न केल्याची बातमी कानावर पडली. आता स्नेहा वाघशी त्याचं पहिलं लग्न झालं होतं. म्हणजे आताचं लग्न हे आविष्कारचं दुसरं लग्न असं बोललं जात असताना मध्येच त्याच्या याआधीच्या आणखी एका लग्नाचा खुलासा करत स्मिता सावंत महिलेनं सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट आविष्कार विरोधात केली आहे. तिचं म्हणणं आहे की आविष्कारनं स्नेहा वाघनंतर तिच्याशी लग्न केलं होतं. आणि ठरवून तिला फसवलं आहे.

Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral
स्वातंत्र्यदिनी फरमानी नाझनं गायलं 'ए मेरे वतन के लोगो', काय म्हणाले लोक?

स्नेहा सावंत हिनं फेसबूकवर पोस्ट शेअर करत आविष्कार दारव्हेकरची आपण दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे. तिनं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिनं त्याच्यासोबतचा लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात आविष्कार तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे.

Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral
Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viralFacbook post image

तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे,''नमस्कार मी अवनी( स्मिता)...आविष्कारची पत्नी..आम्हाला एक ५ वर्षांचा मुलगा आहे. आविष्कारने मला ठरवून पूर्णपणे फसवलं आहे. आमचा घटस्फोट झालेला नसतानाही त्यानं या मुलीशी लग्न केलं आहे..ते ही मला कळू न देता. त्या मुलीचे घरचे मला ओळखत होते, मी त्यांच्या घरी देखील गेले होते..तरी देखील त्या मुलीच्या आणि याच्या घरच्यांनी मला पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या लुटलं आहे. माझे दागिने विकले..माझ्या नावार खूप कर्ज करून ठेवलं, माझे, माझ्या आई वडिलांचे पैसे हवे तसे वापरले…. आणि आता त्याच्याकडे पैसे मागितले तर त्याने मला सांगितलं की कोर्टात जाऊन माग…त्याच्या घरी गेले तेव्हा मला हातापाया पडायला लावलं…तरच पैसे देईन म्हणाला… त्या मुलीला विचारलं असता ती मला उलट बोलायला लागली… मारायला धावून आले अंगावर….”, असे आरोप स्मिता सावंत हिने केले आहेत.

Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral
विशालचं वयाच्या ९ व्या वर्षी लैंगिक शोषण; म्हणाला,'वडीलांना सांगितले तर ..'

आविष्कारनं स्नेहा वाघशी लग्न केलं तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आविष्कारने आणखी एक लग्न केल्याचं बोललं जात आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीनं तसा दावा केल्याचं समोर आलं आहे.

Marathi Big Boss fame Avishkar Dawhekar wife smita sawant facebook post viral
सुजय डहाकेच्या 'श्यामची आई' चा टीझर रिलीज, ओम भूतकर साकारणार साने गुरुजी

आता आविष्कारनं तिसरं लग्न केल्याचं बोललं जात आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्यानं काही फोटो शेअर केले होते. ज्या फोटोत त्याचे पत्नीसोबतचे फोटोही होते. ते दोघेही कुठेतरी बाहेर फिरायला गेल्याचं दिसत आहे. आणि हे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झालेले दिसून आले. आणि याच फोटोंनी आविष्कारच्या तिसऱ्या लग्नाची बातमीही पसरवली. पण अद्याप याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ना त्याच्या नव्या पत्नीविषयीची माहिती समोर आलेली आहे. आता आविष्कार चर्चेत आलाय ते त्याच्या कथित दुसऱ्या लग्नामुळे. पहायचं आता अभिनेता यावर काय स्पष्टिकरण देतो ते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com