सुजय डहाकेच्या 'श्यामची आई' चा टीझर रिलीज, ओम भूतकर साकारणार साने गुरुजी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून दिग्दर्शक सुजय डहाकेनं सोशल मीडियावर सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आणणारा पोस्टर शेअर केला आहे.
Om Bhutkar As Sane Guruji in sujay Dahake's Shyamchi Aai, Teaser Release
Om Bhutkar As Sane Guruji in sujay Dahake's Shyamchi Aai, Teaser ReleaseInstagram

Sujay Dahake's Shyamchi Aai Movie: भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा हे चित्र भारतात संबंध पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच देशाच्या क्रांतिकारी इतिहासाला उजाळा देताना दिसत आहेत. या भव्य आणि दिव्य दिनाचं निमित्त साधून दिग्दर्शक सुजय डहाकेनं(Sujay dahake) 'श्यामची आई' या त्याच्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. त्यात 'शाळा','फुंतरु','आजोबा','केसरी' सारखे सिनेमे बनवणाऱ्या सुजयच्या सिनेमांनी नेहमीच प्रेक्षकांना एका उत्कृष्ट कलाकृतीच्या चविष्ट चवीची सवय लावल्या कारणाने श्यामची आई ( Shyamchi Aai) सिनेमाविषयीही कुतूहल होतंच.(Om Bhutkar As Sane Guruji in sujay Dahake's Shyamchi Aai, Teaser Release)

Om Bhutkar As Sane Guruji in sujay Dahake's Shyamchi Aai, Teaser Release
Anjali Arora Trolled Again : अंजली पुन्हा ट्रोल; तिरंगा फडकवल्यानंतर युजर म्हणाले...

'श्यामची आई' या सिनेमाची निर्मिती अमृता फिल्म्स बॅनरअंतर्गत अमृता अरुण राव यांनी केली आहे. अमृता राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुजय सारखा दिग्दर्शक नेहमीच दर्जेदार साहित्याची अचूक निवड करत त्याला दृकश्राव्य माध्यमातून लोकांच्या भेटीस आणत गेला आहे. त्यातही 'श्यामची आई' हा विषय लोकांच्या जवळचा आहे, साने गुरुजींवर आधारित या पुस्तकानं, यावर आलेल्या सिनेमानं लोकांच्या मनात आपलं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अर्थातच सुजय करत असलेल्या 'श्यामची आई' सिनेमात कलाकार कोण, साने गुरुजी कोण साकारणार हे जाणण्यासाठी प्रेक्षक अधिक उत्सुक होते. आता हे रहस्य दिग्दर्शक सुजय डहाकेनं चाहत्यांसमोर आणलं आहे.

Om Bhutkar As Sane Guruji in sujay Dahake's Shyamchi Aai, Teaser Release
Anjali Arora च्या फेक MMS चा झाला खुलासा, मग आता का ट्रोल होतेय अभिनेत्री?

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं सुजय डहाकेनं श्यामची आई या सिनेमातील साने गुरुजींचा फर्स्ट लूक समोर आणणारं पोस्टर रिलीज केलं आहे. अभिनेता ओम भूतकर(Om Bhutkar) या सिनेमात साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. श्यामची आई या सिनेमाच्या निमित्तानं ओम भूतकरनं एक नवं आव्हान स्विकारलं आहे. यापूर्वी विविध नाटकांतून आणि सिनेमातून ओम आपल्याला दिसलेला आहे.

Om Bhutkar As Sane Guruji in sujay Dahake's Shyamchi Aai, Teaser Release
Anjali Arora अखेर व्हायरल MMS वर चुप्पी तोडत म्हणाली,'माझ्यासोबत याआधीही..'

आपल्या अनेक भूमिकांच्या माध्यमातून नेहमीच ओम अॅंग्री यंग मॅन अंदाजात दिसला होता. पण 'श्यामची आई' सिनेमातून संयमी शिक्षकाच्या भूमिकेत तो कसं लोकांचे मन जिंकेल हे पाहणं अधिक उत्सुकतेचं ठरेल. कदाचित साने गुरुजींची ही भूमिका ओमच्या करिअरला एक वेगळं वळण देणारी ठरेल. साने गुरुजींसारखं दिसण्यापासून ते त्यांचे हावभाव अचूक टिपण्यासाठी ओमनं बरीच मेहनत घेतलेली आहे. या सिनेमातील गाण्यांना मेलडी किंग अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आहे. २०२३ मध्ये हा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.

ओम भूतकर हा एक चतुरस्त्र अभिनेता आहे. त्यानं अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यानं अनेक पुरस्कारही आपल्या अभिनय कारकिर्दीत पटकावले आहेत. सर्व बाजूंनी परिपूर्ण असणारा अभिनेता म्हणूनच आपण ओम भूतकरची साने गुरिजींच्या भूमिकेसाठी निवड केली असं दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाला आहे. तसंच, श्यामची आई सिनेमात ओम एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळेल असं देखील सुजय म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com