Bigg Boss म्हणजे निव्वळ पॉलिटिक्स.. मतांचे आकडे दाखवत प्रेक्षकानेच केली पोलखोल

बिग बॉस मराठी 4 चा विनर म्हणून अक्षय केळकरचं नाव घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी निकालासंदर्भात अनेक उलट-सुलट चर्चा करताना दिसत आहेत.
Marathi Bigg Boss 4 Result
Marathi Bigg Boss 4 ResultEsakal

Marathi Bigg Boss 4: बिग बॉस मराठी ४ चं पर्व नुकतंच संपलं आहे. अक्षय केळकर यंदाच्या सिझनचा विजेता ठरला आहे. पण जसा विजेता घोषित झाला तशी वादात्मक चर्चा सुरु झाली ती निकाल योग्य नसल्याची. आता या वादात अपूर्वा-किरण माने यांचे चाहते सामिल आहेत असं म्हटलं तर तसं १०० टक्के म्हणता येणार नाही.( Marathi Bigg Boss 4 result aKshay kelkar winner public reaction)

Marathi Bigg Boss 4 Result
Bigg Boss Marathi 4: 'पर्सनल लाईफ टी.व्ही वर एक्सप्रेस करणं..', सिझन संपला पण रुचिराच्या पोस्टनं खळबळ

बिग बॉस मराठी ४ चा निकाल योग्य लागला नाही असे म्हणणारे सर्वसामान्य प्रेक्षकही आहेत ज्यांनी शो आपल्या नजरेतून पाहिल्यावर विजेता कोण असावा याची गणितं बांधली होती. अनेकांच्या मते अक्षय केळकर हा शो चा विजेता असूच शकत नाही. तशा प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर पडलेला पहायला मिळत आहे.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

आता इथवर ठीक होतं हो...पण किरण मानेंच्या एका चाहत्यानं चक्क आपल्या संपूर्ण कुटुंबातून त्यांना किती मतं गेली याचा हिशोब बांधत शो च्या निर्मात्यांवर थेट आरोप केला आहे. त्यानं आपल्या कमेंटमध्ये लिहिलं आहे की,'आमच्या साठी तर तुम्हीच जिंकला आहे आम्ही नवरा बायकोनी 3500 व्होट दिले एकंदरीत पॉलिटिक्स आहे big boss मधे पण हे सिद्ध झाले. सगळे लोक तुमच्या बाजूने बोलत आहे सगळीकडे तुमची चर्चा आहे'

Marathi Bigg Boss 4 Result
Bigg Boss Marathi 4: पैसे घेऊन घराबाहेर पडलेल्या राखीसाठी विकास पाटीलनं केलेली पोस्ट चर्चेत..

आता किरण मानेंच्या या चाहत्याप्रमाणेच इतरही अनेक बिग बॉस मराठी पाहणाऱ्या प्रेक्षकांनी निकालावर नाराजगी व्यक्त केली आहे.

पण असंच तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com