'अ‍ॅमेझॉन प्राइम'वर वीकेंडला काय पाहावं? प्रश्न पडल्यास हे नक्की वाचा 

amazon prime video
amazon prime video

प्रेमकहाण्यांपासून प्रेरित करणाऱ्या कथांपर्यंत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर  वीकेंड प्‍लॅन्‍ससाठी नाट्य, रोमान्स व अॅक्‍शनने भरलेले चित्रपट, वेब सीरिज उपलब्ध असतात. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या मोबाइल एडिशनसह प्रेक्षकांना आता स्ट्रिमिंगसाठी उपलब्‍ध असलेले रोमांचक चित्रपट व शोजमधून निवड करण्‍याची संधी मिळाली आहे आणि ही सुविधा अगदी मोफत आहे. कुठून सुरूवात करावी असा प्रश्न पडल्यास आजच वॉचलिस्‍टमध्‍ये या मराठी सुपरहिट चित्रपटांची भर करा.

दुनियादारी (Duniyadari) – ७०च्‍या दशकातील काळाला सादर करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्‍दर्शन संजय जाधव यांनी केले आहे आणि हा चित्रपट प्रेममय प्रवासाला सादर करतो. हा चित्रपट लेखक सुहास शिरवळकर यांच्‍या दुनियादारी याच नावाच्‍या कादंबरीवर आधारित आहे. हा दशकातील (२०१०-२०२०) एकमेव भारतीय चित्रपट आहे, ज्‍याने सिनेमागृहांमध्‍ये ४० आठवडे पूर्ण केले आहेत. हा चित्रपट कॉलेजमधील काही मित्रांच्‍या अवतीभोवती फिरतो, जे प्रेमामध्‍ये असलेल्‍या त्‍यांच्‍या मित्रांना विवाह करण्‍यामध्‍ये मदत करतात. पण जसा प्रवास पुढे सरकतो, तसे त्‍यांना समजते की त्‍यांचा मित्र एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. काही वर्षांनंतर ते त्‍यांच्‍या रोजच्‍या भेटण्‍याच्‍या ठिकाणी भेटतात आणि जुन्‍या चांगल्‍या आठवणी व मैत्रीला उजाळा देतात.

नटसम्राट (Natsamrat) – अद्वितीय लेखन व लक्षवेधक अभिनय असलेला हा अत्यंत वास्‍तविक चित्रपट पाहिलाच पाहिजे असा आहे. सर्वोत्तम नाट्यीकरण या चित्रपटाला अत्‍यंत खास बनवते. प्रमुख भुमिकेत नाना पाटेकर, मेधा मांजरेकर आणि विक्रम गोखले असे दिग्‍गज कलाकार आहेत. 

भातुकली (Bhatukali) – चित्रपटाला अत्‍यंत खास बनवणारी बाब म्‍हणजे चित्रपटाचे कथानक. तुम्‍ही तुमच्‍या मित्रांना निवडू शकता, पण तुमच्‍या कुटुंबाला निवडू शकत नाही. तुम्‍ही याच विचारसरणीसह जन्‍मलेले आहात आणि वर्षानुवर्षे तुम्‍हाला कुटुंबातील सदस्‍यासारखे 'वागण्‍याची' सवय झाली आहे. पण ही वागणूक किती प्रामाणिक राहिल आणि ती किती प्रभावीशील राहिल? हा टप्‍पा किती काळ सुरू राहिल? प्रेम, हृदयभंग व आंबट-गोड नात्‍यांची हृदयस्‍पर्शी कथा 'भातुकली' हा श्रीकांत देशमुख व त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांवर आधारित चित्रपट आहे.

हिरकणी (Hirkani) – हा चित्रपट एक अस्‍सल कलाकृती आहे आणि तुम्‍हाला निश्चितच थक्‍क करेल. आपल्या तान्‍ह्या मुलापर्यंत पोहोचण्‍याचा धाडसी प्रयत्‍न करणा-या आईची वास्‍तविक कथा असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्‍येक सूक्ष्‍म भावनांना सुरेखरित्‍या सादर करतो. ही गवळण हिराची कथा आहे, जी रायगडाच्‍या पायथ्‍याशी राहते आणि दूध विकण्‍यासाठी दररोज गडावर जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्‍या आदेशानुसार सायंकाळनंतर गडाचे दरवाजे बंद झाल्‍यावर सकाळशिवाय उघडू शकत नाहीत. एके दिवशी हिराला उशीर होतो आणि तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झालेले असतात. ती तिच्‍या तान्‍ह्या मुलापर्यंत पोहोचण्‍यासाठी काळोख्‍या रात्रीमध्‍ये उंच कड्यावरून खाली उतरण्‍याचे धाडस करते.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची माहिती

एअरटेलसोबत सहयोगाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने फक्‍त ८९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये 'प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन प्‍लान' सादर केला आहे. हा विशेषत: भारतामध्‍ये सादर करण्‍यात आलेला सिंगल-युजर मोबाइल-ओन्‍ली प्‍लान आहे, जो एअरटेल युजर्सना १ महिन्‍याच्‍या मोफत ट्रायल कालावधीसह एचडी क्‍वॉलिटीमध्‍ये अॅमेझॉन प्राइ‍म व्हिडिओचे स्ट्रिमिंग देतो.

\तुमच्‍या आवडीचे शोज व चित्रपट कशाप्रकारे स्ट्रिम करू शकता?
एअरटेल ग्राहक त्‍यांच्‍या मोबाइल क्रमांकाचा वापर करत एअरटेल थँक्‍स अॅपमधून अॅमेझॉनवर साइनिंग अप करण्‍याद्वारे ३० दिवसांच्‍या मोफत ट्रायलचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे प्रेक्षक विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये एक महिन्‍यासाठी मोफत त्‍यांच्‍या आवडीचे शोज पाहू शकतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com