मराठी चित्रपटांना वाट दिसु दे रे देवा, वाट दिसु दे : कोरोनाच्या संकटातुन मार्ग काढणे झाले अवघड

marathi cinema and television facing lots of problems due to corona,.jpg
marathi cinema and television facing lots of problems due to corona,.jpg

मुंबई - एकीकडे हिंदी चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत असताना दुसरीकडे मराठी चित्रपट, मालिका यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाच्या काळात रिलीज झालेल्या एका मराठी वेब सिरीजचे नाव सांगायचे झाल्यास बराच काळ विचार करावा लागेल. सुहास शिरवळकर लिखित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित समांतर या वेब सिरीज शिवाय अलीकडच्या काळात मराठीत फार काही आलं नाही. हे कटु सत्य असले तरी वस्तुस्थिती आहे. आणि ती नाकारुन चालणार नाही.

मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेचा विचार केला तर अमिताभ बच्चन, आयुष्यमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’,  अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ या बडय़ा चित्रपटांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला. त्याला प्रेक्षकांकडुन चांगली पसंती देखील मिळाली. पुढील काळात सलमान खानचा ‘राधेय’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, वरुण धवनचा ‘कुली नं १’,  अजय देवगणचा ‘मैदान’, रणवीर सिंगचा ‘८३’ असे बडे चित्रपट थिएटर सुरू होण्याची वाट बघत आहेत. दुसरीकडे मराठीत आता कुठे काही मालिकांचे चित्रिकरण  सुरु झाले आहे. त्यातही मालिकांच्या सेटवर एखाद्या कलाकाराला कोरोनाची लागण होणे, त्यामुळे पुन्हा चित्रिकरणात येणारा अडथळा याने निर्मात्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचे चिञ दिसुन येते.

सध्याच्या या पार्श्वभुमीवर बोलताना एका वृत्तपञाला दिलेल्या मुलाखतीत ‘वायकॉम १८ मराठी’चे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले , सर्व काही सुरळीत झाले तर हिंदीची लाट दिवाळीत येईल, पण मराठी चित्रपटांना जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण पुणे जिल्हा ही कोरानाने बाधित क्षेत्रं आहेत आणि मराठी चित्रपटाला याच शहरातून जास्त व्यवसाय मिळतो, . एकुण परिस्थितीचा विचार करता २०२१ हे वर्ष मराठी सिनेमाला नवे वळण देणारे ठरेल.आता वेळ आली आहे दर्जा टिकवून प्रॉडक्शन डिझाइनमध्ये बदल करण्याची. मराठी चित्रपटाच्या व्यावसायिक मर्यादा लक्षात घेता ते आवश्यक आहे.  हिंदी चित्रपट आज ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत, मात्र ओटीटीवर मराठीला मागणी नाही. अशा काही मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे.

ज्या वेगाने बॉलीवूडमध्ये नवनवीन वेब सिरीज येत आहेत. त्या प्रवाहात मराठी चित्रपटसृष्टी जवळपासही नाही. यात मोठा फरक पडतो तो प्रभावी संहितेचा. मराठीमध्ये तुलनेने तितके असे सकस, वेगळ्या धाटणीचे लेखन पुढे येत नसल्याचे अनेक निर्मात्यांचे म्हणणे आहे. हिंदीहुनही प्रभावी ठरेल असा आशय मराठी साहित्यात आहे माञ त्यावरुन तेवढ्या ताकदीचे असे काही निर्माण होत नसल्याची खंत काही कलावंत, दिग्दर्शक, व्यक्त करतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com