मराठी सिनेमाला जीएसटीमधून वगळण्याची मराठी महामंडळाची मागणी 

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

मराठी चित्रपटाला सध्या बरे दिवस नाहीत. हा सिनेमा चालावा म्हणून सरकार या सिनेमाला अनुदानही देते. असे असताना 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी या करप्रणालीमधून मराठी सिनेमाला वगळावे व आज आहे तसा तो करमुक्त राहू द्यावा अशा आशयाचे विनंती वजा पत्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहिले आहे. 

मुंबई : मराठी चित्रपटाला सध्या बरे दिवस नाहीत. हा सिनेमा चालावा म्हणून सरकार या सिनेमाला अनुदानही देते. असे असताना 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी या करप्रणालीमधून मराठी सिनेमाला वगळावे व आज आहे तसा तो करमुक्त राहू द्यावा अशा आशयाचे विनंती वजा पत्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहिले आहे. 

2 जूनला लिहिलेल्या या पत्रात मराठी चित्रपटाची सध्याची अवस्था थोडक्‍यात विशद करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटाला कोणताही कर नव्हता. त्यामुळे याचे तिकिटदर सर्वांना परवडत होते. आता जर 28 टक्‍क्‍यांचा जीएसटी लागू झाला तर मराठी सिनेमाचे दर कमालीचे वाढतील. त्याचा थेट फटका मराठी सिनेमाला बसेल. त्यामुळे आम्हाला जीएसटीमधून वगळण्यात यावे अशी मागणी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्राद्वारे केली आहे. 

Web Title: Marathi cinema GST entertainment esakal news