
सोलापूरचा मराठी दिग्दर्शक करण जोहरसोबत करतोय काम; कोण आहे अक्षय इंडीकर?
आज करण जोहर(Karan Johar) त्याचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करीत आहे. सोशल मीडियावर तर अनेक बड्या सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच करणला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर करण जोहर प्रित्यर्थ असलेल्या पोस्ट्सचा नुसता धो-धो पाऊस पडला आहे. सोलापूरचा(Solapur) राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अक्षय इंडिकरनंही(Akshay Indikar) करण जोहरला वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा देताना त्याचे एका गोष्टीसाठी खूप खूप आभार मानले आहेत. अक्षयनं या पोस्टमध्ये(Post) करण जोहरसोबत आपण नवा प्रोजेक्ट करत असल्याचं देखील सांगितलं आहे. आणि करणनं खास त्याला बर्थ डे पार्टीला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे. कोण आहे अक्षय इंडीकर? चला जाणून घेऊया त्याच्याविषयी थोडक्यात. (Akshay Indikar marathi director from solapur)
हेही वाचा: 'कभी ईद,कभी दिवाली' मध्ये बड्या साऊथ स्टारची एन्ट्री, सलमाननं दिली मोठी ऑफर
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलापूरचा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरनं 'उदाहरणार्थ नेमाडे','त्रिज्या', 'स्थलपुराण' या सिनेमांच्या माध्यमातून सातासमुद्रा पल्याड आपलं काम पोहोचवलं आहे. त्याच्या 'त्रिज्या' सिनेमानं तर 'रजत कमल पुरस्कार' पटकावत आपल्या नावावर राष्ट्रीय पुरस्काराची नोंद केलेली आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये अक्षय इंडीकरच्या सिनेमांचा चांगलाच बोलबाला झाला आहे. जागतिक सिनेमातील दर्जेदार सिनेमांची संकलित यादी बनविणाऱ्या 'मुबी डॉट कॉम' या प्रतिष्ठित संकेतस्थळावर दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या 'स्थलपुराण' या सिनेमाला स्थान मिळाले आहे. डॅनियन सॅमन या मान्यवर सिने-समीक्षकानं ती यादी तयार केली होती. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारी ही यादी जागतिक सिनेविश्र्वात महत्त्वाची मानली जाते.
आता अक्षय इंडीकरला बॉलीवूडमधला स्टार दिग्दर्शक करण जोहरसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अक्षयनं स्वतः यासंदर्भात फेसबूकवर भावूक पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्टसोबत अक्षयनं करणसोबतचा फोटोही शेअर केला आहे. तो म्हणाला आहे,"ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो लहानपणापासून 'कुछ कुछ होता है' अगणित वेळा बघितला होता . देशातल्या एवढ्या मोठ्या बॉलिवूड नामक प्रकरणाचा खरा बादशहा जर कोण असेल तर तो हा माणूस . मसान सारखा सिनेमा पूर्ण उभा केला तो दिमाखात लोकांपर्यंत पोहोचवला याचं बरंच श्रेय या माणसाला जातं . मला कधीच वाटलं न्हवतं मी करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शन सोबत काम करेल . आणि हे स्वप्न पण बघण्याचं काही कारण न्हवतं. पण काही स्वप्नं आपल्या नकळत आपण मनाशी बाळगत असतो . स्वतः दिगदर्शक असलेल्या स्वतःच्या कंपनीत शेकडो नव्या फिल्ममेकर ला संधी देणारा हा माणूस अनेक तरुण फिल्म मेकर ला उभं करतोय .
आज करण जोहरचा वाढदिवस . आमची पहिली भेट त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पार्टीत होईल असं वाटलं न्हवतं .
Wish you a very happy birthday Karan Johar 😊
- अक्षय इंडीकर Akshay Indikar
हेही वाचा: Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज
करण जोहरनं आतापर्यंत त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्या माध्यमातून अनेक नव्या कर्तृत्ववान दिग्दर्शकांना दिग्दर्शनाची संधी दिली आहे. आता त्यानं सालोपूरच्या मराठमोळ्या अक्षय इंडीकरला ही संधी दिल्यानं मात्र मराठी प्रेक्षकाचं मन नक्कीच सुखावणार. पण आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिल ती 'त्रिज्या', 'स्थलपुराण', 'उदाहरणार्थ नेमाडे' सिनेमे बनवणारा अक्षय करणसोबत मिळून नेमका कोणता सिनेमा भेटीस घेऊन येत आहे त्याविषयी.
Web Title: Marathi Director Akshay Indikar Work With Karan Joharpost
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..