'कभी ईद,कभी दिवाली' मध्ये बड्या साऊथ स्टारची एन्ट्री, सलमाननं दिली मोठी ऑफर Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan- Kabhi Eid, Kabhi Diwali Casting

'कभी ईद,कभी दिवाली' मध्ये बड्या साऊथ स्टारची एन्ट्री, सलमाननं दिली मोठी ऑफर

सलमान खानचा(Salman Khan) 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाच्या कास्टिंगविषयी रोजच नवनवीन अपडेट येत आहेत. कधी कोणता कलाकार सिनेमातून बाहर पडत आहे तर कधी कोणाला बाहेरचा रस्ता प्रॉडक्शनकडून दाखवला जात आहे. आता चर्चा आहे की सलमान खानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागली आहे.(Salman Khan- Kabhi Eid, Kabhi Diwali Casting, South Star Entry)

हेही वाचा: 'लग्नाचा विचारही मला अस्वस्थ करतो' असं का म्हणाली श्रुती हासन?

सलमानच्या 'कभी ईद,कभी दिवाली'(Kabhi Eid,Kabhi Diwali) सिनेमात पुजा हेगडे आणि व्यंकटेश महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत आता बातमी आहे की सलमान खाननं आणखी एका बड्या साऊथच्या स्टारला आपल्या सिनेमाची ऑफर दिली आहे. प्रसिद्ध अभिनेता जगपति बाबू(Jagapathi Babu) या सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात खलनायक साकारताना हा साऊथ स्टार दिसेल. एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार,सलमान खान पॅन इंडिया फिल्म बनवत आहे. त्यामुळे कास्टिंग करताना तो खूप सजग आहे. चांगली स्टार कास्ट घेण्यात तो कुठलीच कसर बाकी ठेवत नाहीय असंच चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

हेही वाचा: १७ वर्ष लिव्ह-इनमध्ये अन् ५४ व्या वर्षी दिग्दर्शकाचा लग्नाचा निर्णय, का?

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सलमाननं आपल्या टीमच्या सोबत बसून काही चांगल्या कलाकारांची आणि आपल्या आवडत्या कलाकारांची यादी बनवली. या सिनेमात सुरुवातीला त्यानं पूजा हेगडेला लॉक केलं. आणि नंतर आपला जवळचा मित्र व्यंकटेशला सिनेमात घेतलं. आता सलमाननं तेलगु सिने इंडस्ट्रीतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या' कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात घेतलं आहे. ज्याचं नाव जगपति बाबू आहे. वृत्तानुसार,जगपति बाबूला 'दबंग ३' मध्ये कास्ट करण्यात येणार होतं. परंतु, तारखा जुळून आल्या नाहीत म्हणून जगपति 'दबंग ३' मध्ये काम करू शकले नव्हते.

हेही वाचा: Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज

आता सलमान खानने पुन्हा जगपति बाबूला आपल्या सिनेमात काम करायची ऑफर दिली. कारण व्यंकटेश आणि सलमानला टक्कर देईल असा तगडा खलनायक सिनेमात हवा होता. अर्थात,अजूनही जगपति बाबूविषयीचं कोणतंही अधिकृत निवेदन 'कभी ईद,कभी दिवाली' च्या टीमकडून काढण्यात आलेलं नाही. या सिनेमात सलमाननं शहनाज गिलला देखील संधी दिली आहे. हा सिनेमा ३० डिसेंबर,२०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाआधीत सलमानचा हा सिनेमा विविध कारणांनी चर्चेत येतोय हे पाहून बाॉक्सऑफिसवरही हा सिनेमा धमाल करेल असं बोललं जात आहे.

Web Title: Souths Big Star Entry In Kabhi Eid Kabhi Diwali Salman Khan Offered The Role Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top