esakal | 'असा' चित्रपट पुन्हा न होणे, उजाळा 'बालगंधर्व' चित्रपटाच्या आठवणींना
sakal

बोलून बातमी शोधा

Actor subodh bhave and ravi jadhav

'असा' चित्रपट पुन्हा न होणे, उजाळा 'बालगंधर्व' चित्रपटाच्या आठवणींना....

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील जे सर्वोत्तम चित्रपट आहेत त्यात दिग्दर्शक रवी जाधव (Ravi jadhav) यांच्या बालगंधर्व (Balgandharva) चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली. त्यावेळच्या राष्ट्रपती पुरस्कारावरही या चित्रपटानं मोहोर उमटविली. अभिनय, संगीत, गायन, छायादिग्दर्शन, कथा आणि दिग्दर्शन यासर्वच पातळ्यांवर या चित्रपटानं आपलं वेगळेपण सिध्द केलं होत. प्रख्यात गायक बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित असणा-या या चित्रपटानं मराठी माणसाच्या मनात आदराचं स्थान पटाकावलं. त्या चित्रपटाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

प्रख्यात दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी आपल्या बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर करुन त्याविषयी रसिकांचे लक्ष त्या पोस्टकडे वेधले आहे. हा चित्रपट तयार करताना आपल्याला कोणच्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्या चित्रपटाचा एका वाड्यात उभारलेला सेट, कलाकारांच्या वेगवेगळ्या गंमती जमती जाधव यांनी यावेळी शेअर केल्या आहेत. रवी जाधव यांच्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

रवी जाधव य़ांनी आपल्या बालगंधर्व चित्रपटाबद्दल जी पोस्ट शेअर केली आहे त्यात ते लिहितात, आज दहा वर्ष झाली ‘बालगंधर्व’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन. भोरच्या वाड्यामध्ये ३३ दिवस अखंड अहोरात्र काम करण्यासाठी साक्षात बालगंधर्वच आम्हा सर्व टिमला बळ देत होते असे अजूनही वाटते. ही कलाकृती साकारत असतानाचा प्रत्येक कडू गोड क्षण अजूनही आठवतो. सेट वरच्या गमती जमती, सेट ते हॅाटेल प्रवास, रात्री हॅाटेल मधील गाण्यांच्या महफीली, सेट वरचे टेन्शन… सर्वच.

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

memories of balgandharva movie

या चित्रपटाने खूप काही दिले. नवे मित्र दिले, नवा दृष्टीकोण दिला, नवे बळ दिले. नवा आत्मविश्वास दिला. केवळ ही दहा वर्षच नाही तर पुढील अनेक दशके मराठी रंगभूमीवरचे हे काही सोनेरी क्षण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा अनूभवता येतील हे नक्की. असा अद्भूत विषय व तो साकारायला झटणारी अशी ब्रीलीयंट टिम पुन्हा पुन्हा मिळत नाही. या सर्व टीमला मनापासून नमन आणि प्रेम. अशा शब्दांत रवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.