दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक, सोशल मिडियावर दिली माहिती..

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आईचे २७ मे रोजी निधन झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
director ravi jadhav's mother passes away
director ravi jadhav's mother passes awaysakal

Ravi jadhav mother : गेल्या बऱ्याच वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत चौकटीबाहेरचे विषय हाताळून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव (ravi jadhav) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांच्या आईचे म्हणजे शुक्रवारी २७ मे रोजी निधन झाल्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. सोबत आईचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. शुभांगीनी जाधव असे त्यांच्या आईचे नाव असून त्यांनी ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (रवी जाधव यांच्या आईचे निधन) (director ravi jadhav's mother passes away)

दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. सध्या जाधव कुटुंबियांवर शोककळा पसरलीय. नुकतंच रवी जाधव यांनी आईचा फोटो शेअर करत '१९ जुलै १९४८ - २७ मे २०२२' असे कॅपशन दिले आहे. सध्या ही बातमी वाऱ्यासारखी पसरत असून चाहते रवी जाधव यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ९ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या वडिलांचे म्हणजे हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे निधन झाले होते. रवी जाधव यांचे आई वडील हे डोंबिवलीत राहायला होते. वर्षभरा नंतर लगेच त्यांच्या आईचे निधन झाल्याने जाधव कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

director ravi jadhav's mother passes away
रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत.. महेश मांजरेकरांची मोठी घोषणा..

रवी जाधव यांचे वडील गिरणी कामगार होते. रवी जाधव यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरुन वारंवार आपल्या आई वाडिलांबाबत लिहीत आले आहेत. त्यांच्या आई वडिलांनी केलेला संघर्ष, संसारासाठी केलेली मेहनत याबाबत ते कायमच सांगत आले आहेत. मध्यंतरी रवी जाधव यांनी एक फोटो शेअर करत आई बाबांविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. '१९८२ च्या आधी म्हणजेच गिरणी कामगारांच्या संपाच्या आधीचे दिवस असे होते. ८२ नंतर कधीही असा फोटो काढता आला नाही… असो…. महाभीषण संपात पण तग धरुन आम्हा भावंडांना आपल्या पायावर उभे करणारे हेच ते माझे ‘स्पेशल आईबाबा’!!!’, असं लिहित त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com