Sumeet Pusavale: 'बाळूमामा' फेम अभिनेता सुमीतचं झालं शुभमंगल सावधान...

Sumeet Pusavale
Sumeet PusavaleEsakal
Updated on

सध्या सर्वत्र लग्न सराई सुरु आहे. त्यातच मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतंच अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीही यांनीही लग्न केलं . आता आणखी एका अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे.

कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे गेल्या काही दिवसांपासून याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने प्रिवेडिंगचे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मिडियावर तो चर्चेत होता. त्यानंतर काल त्याचा साखरपुड्याचा फोटोही व्हायरल झाला होता. सूमित पुसावळे मोनिका महाजन सोबत आज १४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या दोघांचा सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला. या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. तर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Sumeet Pusavale
Boycott Pathan: सुशांतच्या चाहत्यांमूळं शाहरुखच्या 'पठाण'चा होतोय वाद?

खरं तर लागीरं झालं जी या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला होता. यात तो विरोधी भूमिकेत दिसला होता. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही तो झळकला होता. बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत सुमीत प्रमुख नायकाची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com