Eknath Shinde: आरोह वेलणकरचं पुन्हा मोठं वक्तव्य, 'ठाण्यात तर...'| aroh welankar reaction to shivsena leader Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aroh welankar

Eknath Shinde: आरोह वेलणकरचं पुन्हा मोठं वक्तव्य, 'ठाण्यात तर...'

Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकारणाचा रंग हा दिवसेंदिवस बदलत चालल्याचे दिसून आले आहे. त्यावर आतापर्यत (Bollywood News) अनेक खलबतं होऊन देखील त्याचा कोणताही परिणाम एकनाथ शिंदे यांच्या बंडावर झालेला नाही. काही दिवसांपूर्वी (Bollywood Actor ) शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या (Shivsena News) बंडखोरीचा फटका आघाडी सरकारला बसला आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकरची प्रतिक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यापूर्वी देखील मराठी - हिंदी मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या (Viral News) सेलिब्रेटींनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. अभिनेत्री हेमांगी कवी, अभिनेता सुमीत राघवन, ऋचा चढ्ढा, स्वरा भास्कर, कंगना रनौत यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यासगळ्यात अभिनेता आरोह वेलणकरनं पुन्हा एक प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Viral Post: हेमांगी कवी म्हणते, 'औकात में रेह!' पोस्टची तळटीप चर्चेत

आरोहनं पुन्हा भाष्य करुन नेटकऱ्यांची काही अंशी नाराजी देखील ओढावून घेतली आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं अनेकदा सांगितलं जातं. पण एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केलं आहे. ही जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे. अशा शब्दांत आरोहनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या वक्तव्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा: Viral Video: चक्क थिएटरच्या छतावर चढून केला शिल्पानं डान्स

Web Title: Marathi Entertainment Actor Aroh Welankar Reaction To Shivsena Leader Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..