'जंगजौहर' होणार 'पावनखिंड' नावाने प्रदर्शित

marathi film pawankhind
marathi film pawankhind

'मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची रेलचेल पहायला मिळते. फत्तेशिकस्त, हिरकणी, फर्जंद, आनंदी गोपाळ या मराठी ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव सुरवातीला जंगजौहर असे ठेवण्यात आले होते. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी नाव बदलून पावनखिंड असे ठेवले आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. त्यात चित्रपटाचे नाव जंगजौहर लिहीले होते.

आता पावनखिंड नाव असलेल्या पोस्टरचे प्रदर्शन नुकतेच चित्रपटाच्या टिमने केले आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि दिगपाल लांजेकर, निर्माते अजय- अनिरूध्द हे उपस्थित होते. पावनखिंड या चित्रपटाच्या नव्या नावाच्या पोस्टर लॉंचला अंकित मोहन, अजय पुरकर, अक्षय वाघमारे, चिन्मय मांडलेकर हे चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.

चिन्मय मांडलेकरने चित्रपटाचे नाव बदलण्याच्या कारणाबाबत बोलताना सांगितले कि,'बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमावरचा चित्रपटाला पावनखिंड हे नाव अत्यंत योग्य आहे. इतके दिवस काही तांत्रिक करणांमुळे हे नाव उपलब्ध नव्हतं. पण शेवटी हा महाराजांचा अशिर्वाद आहे कि हे नाव आता उपलब्ध झालेले आहे.

आपल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नाव बदललं. दरम्यान एक वर्षाचा कालावधी यात गेला. 24 तारखेला लॉकडाऊन सुरू झाला आणि 18 ला शूटिंगची शेवटची तारीख होती. त्यामुळे त्या दिवसापर्यंत सगळ्या टीमने राबून हा चित्रपट पूर्ण केला. सगळे कलाकार आणि चित्रपचटाची टीम वाट पाहत होती की कधी हा चित्रपट लोकांपर्यांत पोहचेल. इतकी मोठी अर्थिक गुंतवणूक करून अनिश्चित काळासाठी थांबून राहिल्याबद्दल मी आमच्या निर्मात्याचं कौतुक करतो असंही मांडलेकर यांनी म्हटलं.

यावेळी अभिनेता अंकित मोहनने चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आलेला अनुभव सांगितला. पवानखिंड हा चित्रपट 10 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इतिहासातील बाजीप्रभू आणि बांदल सेनेची अमर गाथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com