esakal | संजय जाधव यांची नवी शाळा; 'फिल्मॅजिक' मध्ये घडणार नवे विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi film producer director Sanjay Jadhav started new film school for talented newcomer Actros

नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे  ‘फिल्मॅजिक’ स्कुलच्या उद्घाटनाला उपस्थित होते.

संजय जाधव यांची नवी शाळा; 'फिल्मॅजिक' मध्ये घडणार नवे विद्यार्थी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनाचा प्रभाव कमी होत असून त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्रातील काम बंद झाले होते. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता. आता अकरा महिन्यांनंतर सिनेसृष्टीला पुन्हा एकदा बहर आला आहे.   संजय जाधव ह्यांच्या ‘फिल्मॅजिक’  फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला सिनेसृष्टीतल्या मोठ-मोठ्या सुपरस्टार्सनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊनमुळे गेले एक वर्ष कार्यक्रम आणि सोहळे बंद झाल्याने मराठी सिनेसृष्टी झाकोळल्यासारखी झाली होती. सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, अंकुश चौधरी, मानसी साळवी, उमेश कामत, सोनाली खरे, सिध्दार्थ जाधव, श्रेया बुगडे, संजय नार्वेकर ह्या सुपरस्टार्ससोबतच नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे अशा सेलिब्रिटींची मांदियाळी ‘फिल्मॅजिक’ स्कुलच्या उद्घाटनाला उपस्थित होते. संजय जाधव ह्यांचे गुरू आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर ह्यांच्या हस्ते फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे उद्घाटन झाले.

संजय जाधव यांना शुभेच्छा देताना सचिन पिळगावकर म्हणाले, “संजयची वाटचाल मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. त्याने अतिशय मेहनतीनं आपलं करीयर घडवलंय. त्याचं नेतृत्व फिल्मॅजिक स्कुलच्या विद्यार्थ्यांचं करिअर घडवायला नक्कीच उपयोगी पडेल.फिल्मॅजिकविषयी संजय जाधव म्हणाले,”सिनेमाच्या मुख्य धारेत समाविष्ट होताना फिल्मसेटवर वापरली जाणारी भाषा, वावरायची पध्दत अशा अनेक गोष्टी नवोदिताला शिकाव्या लागतात. सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना इथला माहौल पाहून अनेकांना भांबावायला होतं. मी स्वानुभवाने शिकत गेलो. पण नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणुन माझ्या आणि सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो.

हेही वाचा : बॉडीगार्डला दीपिका मानते भाऊ; देते तब्बल इतका पगार

हेही वाचा : 'आमच्या स्वप्नांची गुरुकिल्ली'; मराठी अभिनेत्रीने मुंबईत घेतलं घर

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, “महाराष्ट्रीयन फिल्ममेकरने अशा पध्दतीने एक फिल्म स्कुल सुरू करण्याचा विचार करावा ह्याचं मला कौतुक वाटतंय. आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या विद्यार्थ्यांना संजयदादाच्या फिल्ममेकिंगच्या अनुभवाचा लाभ होईल, ह्याचा मला अभिमान आहे.
जेव्हा आम्ही ह्या क्षेत्रात आलो, तेव्हा आम्हांला सिनेतंत्राविषयी माहिती करून देणा-या अशा कोणत्या इन्स्टिट्यूट नव्हत्या. आजकालच्या नवोदितांना फिल्मॅजिक सारख्या फिल्म स्कुल मिळतायत. तर ह्या संधीचा त्यांनी पूरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं. आम्हांला जर संजयदादासारखे मेन्टॉर करियरच्या सुरूवातीला मिळाले असते, तर आजपेक्षा निम्म्या कालावधीतच करियरमध्ये यश संपादन करता आले असते. अशी भावना तेजस्विनीनं व्यक्त केली.

अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणाला, “फिल्मॅजिकच्या निमित्ताने संजयदादाचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ह्याचा मला आनंद आहे. संजयदादाकडे सिनेसृष्टीतल्या कामाचा खूप अनुभव आहे. नव्या कलाकाराला संजयदादा नेहमीच व्यासपीठ मिळवून देतो. त्यामुळे फिल्ममॅजिक ही फिल्म स्कुल सुरू झाल्याचा खूप आनंद आहे”
 

loading image