esakal | ‘महासत्ता होणार म्हणे, महाथट्टा नक्कीच झालीय’

बोलून बातमी शोधा

Marathi movie actor hemant dhome tweet
‘महासत्ता होणार म्हणे, महाथट्टा नक्कीच झालीय’
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेता,चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. तसेच तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. हेमंत चित्रपटांबरोबरच राजकारणाबद्दल देखील सोशल मिडीयावर भाष्य करतो. नुकतच त्याने सरकारवर टिका करत एक ट्विट केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. पण लसीकरण केंद्रावार सध्या कोरोनाचे नियम पाळले जात नाहियेत. काही ठिकाणी लसींची कमतरता आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अशाच एका ठिकाणी लसीकरणासाठी लागलेली रांग आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबद्दल अभिनेता हेमंत ढोमेने ट्विटरवर भाष्य केले आहे. ट्विट करत हेमंत म्हणला, ‘कमीत कमी १ किलोमीटर तरी! गेटवर चेंगराचेंगरी…सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढं करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये..माणसाला माणसासारखं तरी वागवा. महासत्ता होणार म्हणे..महाथट्टा नक्कीच झालीय'. हेमंतच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी रिट्विट केले आहे.

हेमंतने लिहिले आहे की, ‘सर्व नियम पाळणारा... सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा... या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय... खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग!’ सध्या भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी देशात अनेक ठिकाणी लस, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर्स या वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे.