अग्निशमन दलावरील चित्रपटासाठी बंब मिळेना!

टीम ई सकाळ
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अग्निपंख’ या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय टीमने मुहूर्तापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड यांनी अग्निपंखच्या बहुचर्चित पहिल्या टीझर पोस्टरची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी चित्रपटाचा घटनापट मुख्यमंत्र्यांसमोर उलगडला तसेच दिग्दर्शक गणेश कदम यांनी या चित्रपटाच्या भव्यतेविषयी तसेच चित्रीकरणातील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती दिली.

मुंबई : गणेश कदम दिग्दर्शित 'अग्निपंख' हा चित्रपट फायर ब्रिगेडवरील कामगिरीवर बेतला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा चित्रपट होतो आहे. या चित्रपटासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर मात्र या चित्रपटकर्त्यांना मिळेना झाले आहे. यासाठी लागणारे पेहेराव, अग्निशमन दलाचा बंब आदी बाबींची निकड आहे. परंतु, दलाने मात्र या परवानगीसाठी सरकारी कागदांकडे अंगुलीनिर्देश केला आहे, ते पाहता या चित्रपटाच्या टीमने थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

‘अग्निपंख’ या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय टीमने मुहूर्तापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड यांनी अग्निपंखच्या बहुचर्चित पहिल्या टीझर पोस्टरची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी चित्रपटाचा घटनापट मुख्यमंत्र्यांसमोर उलगडला तसेच दिग्दर्शक गणेश कदम यांनी या चित्रपटाच्या भव्यतेविषयी तसेच चित्रीकरणातील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती दिली.

आजवर सैन्यदल तसेच पोलीस दलावर आधारित अनेक सिनेमे आले परंतु माध्यमांमध्ये आणि जनमानसात तुलनेने दुर्लक्षित राहिले आहे. कशाचिही पर्वा न करता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवची बाजी लावून मोहिम फत्ते करणाऱ्या अग्निशमन दलाची शौर्यगाथा इतक्या भव्य प्रमाणात भारतात प्रथमच आणि तेही मराठीत येत असल्याचे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निपंखच्या टीमचे कौतुक केले व आपल्यालाही अभिमान वाटल्याचे सांगितले. या अभिमानास्पद चित्रपटाचा एकूण आवाका लक्षात घेता, आवश्यक असलेल्या बाबींसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड, अभिजीत गायकवाड, दिग्दर्शक गणेश कदम, पटकथा-संवाद लेखक सचिन दरेकर आणि जनसंपर्क अधिकारी मयूर आडकर उपस्थित होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कौतुकाने पाठ थोपटल्याने अग्निपंखच्या टीमचा उत्साह आणखी वाढला आहे.
 

Web Title: Marathi movie Agnipankh Team met Devendra Phadanvis esakal news