Dharmaveer Movie: 'धर्मवीर'मधला तो 'डायलॉग' का हटवला?

राज्याच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडींच्याबाबत सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया होत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनं आघाडी सरकार धोक्यात आले आहे.
Dharmaveer Movie News
Dharmaveer Movie Newsesakal

Maharahtra political Crisis: राज्याच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडींच्याबाबत सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया होत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनं आघाडी सरकार धोक्यात आले आहे. (Shivsena Eknath Shinde) यासगळ्याची ठिणगी धर्मवीर आनंद दिघे यांच्या चित्रपटावरुन सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. अशातच थिटएरमध्ये या चित्रपटात राज ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यातील संवाद दाखवण्यात आला होता. (Marathi Movie) मात्र हाच चित्रपट जेव्हा चॅनेलवर दाखवण्यात आला तेव्हा तो डायलॉग हटविण्यात आल्याचे दिसून आले आहे. (Dharmaveer Movie News)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. एका चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. थिएटरमध्ये दाखवण्यात आलेला हा संवाद चॅनेलवर का हटवण्यात आला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यानं बॉक्स ऑफिसवर देखील विक्रमी कमाई केली होती.

काही दिवसांपूर्वी एका चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून राज ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यातील तो संवाद हटविण्यात आल्याचे दिसून आले आहे. या कृतीचा अमेय खोपकर यांनी ट्विट करुन निषेध व्यक्त केला आहे. ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध. असं त्यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटलं आहे.

Dharmaveer Movie News
Eknath Shinde: एकनाथ शिंदेच्या फोन कॉलने सत्तेत राज ठाकरेंची एन्ट्री होणार का?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वेगानं बदलत आहे. त्यातील घडामोडी अनाकलनीय अशा स्वरुपाच्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी त्यांच्या समवेत असलेले आमदार यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी आघाडी सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

Dharmaveer Movie News
Eknath Shinde: आरोह वेलणकरचं पुन्हा मोठं वक्तव्य, 'ठाण्यात तर...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com