Marathi Movie: 'काय ते कॉलेज,काय ती मुलं, काय ते पोस्टर... म्हणत 'एकदम कडक' चित्रपटानं वेधलं लक्ष

'एकदम कडक' या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हे तरुण कलाकार पडद्यावर धुडगूस घालताना दिसणार हे नक्की.
Marathi Movie: 'Ekdam Kadak' Movie will release on 2nd December.
Marathi Movie: 'Ekdam Kadak' Movie will release on 2nd December.Google
Updated on

Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे.

या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'एकदम कडक' या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप नव्याने मोठ्या पडद्यावर धुडगूस घालायला सज्ज झाला आहे.

पोस्टर पाहता हे कॉलेजचे विद्यार्थी त्यांची कॉलेज लाईफ जगण्याचा मनमुराद आनंद घेतायत हे कळतेय, तर ही मुलं पाहत असणारी मुलगी नक्की कोण आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. (Marathi Movie: 'Ekdam Kadak' Movie will release on 2nd December.)

Marathi Movie: 'Ekdam Kadak' Movie will release on 2nd December.
Vaishali Takkar Suicide: '...नाहीतर माझ्या आत्म्यास शांती मिळणार नाही, वैशालीच्या सुसाईड नोटनं खळबळ

आकर्षक आणि आशयघन अशा या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकदम कडक नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे येत्या २ डिसेंबरला सिनेमागृहात पाहणे रंजक ठरेलच. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे.

तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत.

तर चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

Marathi Movie: 'Ekdam Kadak' Movie will release on 2nd December.
Big Boss Marathi 4: फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी, अमृता-यशश्रीमध्ये जुंपली

'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही, शिवाय पोस्टरवरील ती मुलगी कोण आहे याकडेही साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत, प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com