Big Boss Marathi 4, fight between Yashashri Masurkar And Amruta Deshmukh
Big Boss Marathi 4, fight between Yashashri Masurkar And Amruta DeshmukhGoogle

Big Boss Marathi 4: फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी, अमृता-यशश्रीमध्ये जुंपली

बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्या दरम्यान यशश्रीनं अमृता देशमुखला नॉमिनेट केल्यावर त्यांच्यात कडाक्याचं भांडण रंगलं.
Published on

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठी सिझन ४ सुरु होऊन जस-जसे दिवस पुढे जात आहेत तस-तसे घरातील सदस्यांचे नवनवीन रंग समोर येत आहेत. सुरुवातीला अगदीच मिळमिळीत वाटणारे सदस्यही तोफ बनताना दिस आहेत. नुकताच घरातील पहिला सदस्य बाहेर पडला आहे. गेल्या एपिसोडमध्ये निखिल राजेशिर्कला बिग बॉसचं घर सोडावं लागलं. आणि आता पुन्हा घरात आणखी एका सदस्याला बाहेर काढण्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडत आहे.(Big Boss Marathi 4, fight between Yashashri Masurkar And Amruta Deshmukh)

Big Boss Marathi 4, fight between Yashashri Masurkar And Amruta Deshmukh
Vaishali Takkar Suicide: '...नाहीतर माझ्या आत्म्यास शांती मिळणार नाही, वैशालीच्या सुसाईड नोटनं खळबळ

यावरनंच आता सुरु झाला आहे राडा. मुला-मुलांमध्ये नाही तर घरात नेहमीच दुसऱ्यांच्या छत्रछायेखाली वावरत आहेत अशा वाटणाऱ्या, साध्या-भोळ्या दिसणाऱ्या अमृता देशमुख आणि यशश्री मध्ये कडाक्याचं भांडण रंगलं, अगदी नळावर भांडतात तशा दोघी भांडताना दिसल्या. सध्या तो भांडणाचा प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. चला,जाणून घेऊया याविषयी थोडं सविस्तर.

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल निखिल राजेशिर्केला बाहेर जावे लागले. आज घरामध्ये पार पडणार आहे “फटा पोश्टर निकला झिरो” हे नॉमिनेशन कार्य. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे कळेल लवकरच. यशश्री अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे.

अमृता देशमुखनं चढ्या आवाजात यशश्रीला म्हटलं, "स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखं वागायचं..., ज्या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना..., आता एवढं सगळं ऐकल्यावर यशश्री कशाला गप्प बसतेय. तिनंही कचाकचा बोलत उत्तर दिलंच, “मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये.'

Big Boss Marathi 4, fight between Yashashri Masurkar And Amruta Deshmukh
'हनिमूनला गेलेलं कपल अजून काय करणार..', '36 गुण' सिनेमातील बोल्ड सीनवर स्पष्टच बोलली पूर्वा पवार ...

अशा या जोरदार भांडणानं नॉमिनेशन प्रक्रिया रंगताना दिसेल नवीन भागात ,तेव्हा पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com