
मुलीला मिशी! तो फोटो कुणाचा? 'लंडन मिसळ' काय आहे प्रकरण?
Marathi Movie: अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) या चित्रपटाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात (Social Media Viral News) आली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पहिले (Entertainment News) पोस्टर झळकले असून या पोस्टरमध्ये एका मुलीने पुतळ्यामागे लपून (Poster Viral) त्या पुतळ्याला आपल्या हाताने मिशी लावलेली दिसत आहे. हा नक्की कोणाचा चेहरा आहे आणि याचा नेमका अर्थ काय, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. लवकरच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु होणार असून वर्षअखेरीस 'लंडन मिसळ' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'लंडन मिसळ'बद्दल दिग्दर्शक जालिंदर गंगाराम कुंभार म्हणतात, ''यापूर्वी मी चित्रपट, मालिका केल्या आहेत आता बऱ्याच काळानंतर मी पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच सुभाष घई यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळत असल्याने ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर मराठी प्रेक्षकांना आवडेल असा आशय देण्याचा प्रयत्न मी 'लंडन मिसळ'मध्ये केला आहे.''
एबी इंटरनॅशनल प्रस्तुत व महाळसा एंटरटेनमेंट आणि 'लंडन मिसळ' लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लंडन मिसळ' या चित्रपटाची निर्मिती अमित बसनेत, परी राणा, सुरेश गोविंदराय पै यांनी केली आहे. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा सनीस खाकुरेल यांनी सांभाळली असून वैशाली पाटील सहयोगी निर्माती म्हणून काम पाहिले आहे. मुक्ता आर्ट्स लिमिटेड या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे.
Web Title: Marathi Movie London Misal Announced Based On Ravindranath Tagore Drama Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..