रूप नगर के चिते : गोंधळात टाकणारा टीझर , दोन मित्रांची मैत्री की?

'रूप नगरके चिते' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
roop nagar ke cheetey teaser out
roop nagar ke cheetey teaser outsakal
Updated on

Marathi movie : मैत्रीवर आधारलेला 'रूप नगर के चिते' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच आमच्या भेटीला येत आहे. प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक ख़ास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढउतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच, आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तो पाहून प्रेक्षकांची भलतीच उत्सुकता शिगेला गेली आहे. दोन मित्रांमधील मैत्री की आणखी काही असं संभ्रम टीझर पाहून निर्माण झाला आहे.

(marathi movie Roop Nagar Ke Cheetey teaser out cast release date)

या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा असलेला 'रूप नगर के चीते' हा चित्रपट १६ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकमेकांच्या खांद्यावर विश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. करण किशोर परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. मैत्रीला प्रेमाचा, आपुलकीचा, मस्तीचा आणि हक्काचा असा वेगवेगळा रंग असतो. या सगळ्या रंगाचं अद्भुत इंद्रधनुष्य 'रूप नगर के चीते' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. पण हा रंग मैत्रीचा आहे की प्रेमाचा असा प्रश्न टीझर पाहून चाहत्यांना पडला आहे. कारण एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, त्यावर दुसरा मित्र मात्र ते गांभीर्याने घेत नाही. त्यांच्यातील नाते नेमके काय असणार हे चित्रपटात दिसेलच.

'रूप नगर के चीते' या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे. गीते जय अत्रे यांची आहेत. सुप्रसिद्ध मल्याळम संगीतकार शान रेहमान आणि मनन शाह यांनी संगीत तर पार्श्वसंगीताची जबाबदारी मुजीब माजीद यांनी सांभाळली आहे. हेड ऑफ़ प्रोडक्शन मालविका शाह आहेत. महावीर सबनवार यांनी साऊंड डिझायनिंगची तर प्रशांत बिडकर यांनी प्रोडक्शन डिझायनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा विहान सूर्यवंशी, सागर तिर्लोतकर यांची असून रंगभूषा महेश बराटे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन स्टेनली डी कोस्टा, विहान सूर्यवंशी, संतोष रेड्डी यांचे आहे. रोहन मापुस्कर चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com