टीम ‘उबुंटू’ कडून ‘फन’हित में‘व्हिडीओ’ जारी!

टीम ई सकाळ
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

तुमच्या दिवसाची सुरुवात जर सोसायटीभर पसरलेल्या कचऱ्याने आणि ‘डॉल्बी’च्या भिंती भेदत बाहेर पडणाऱ्या कर्णकटू संगीताने झाली तर काय होईल? टीम 'उबुंटूच्या' वतीने बनवण्यात आलेल्या ‘फन’हित में जारी असणाऱ्या व्हिडीओमधील रहिवाश्यांच्या दिवसाची सुरुवात अशीच काहीशी झालीये. हा गदारोळ नक्की का चालू आहे याचा शोध घेत असताना ‘उबुंटू’मधील धमाल पोरापोरींनी “सण असाच धांगडधिंगा,कचरा करून साजरे करायचे असतात ना?” असा विचारलेला प्रश्न डोळ्यात झणझणीत अंजन घालत आहे.

मुंबई : तुमच्या दिवसाची सुरुवात जर सोसायटीभर पसरलेल्या कचऱ्याने आणि ‘डॉल्बी’च्या भिंती भेदत बाहेर पडणाऱ्या कर्णकटू संगीताने झाली तर काय होईल? टीम 'उबुंटूच्या' वतीने बनवण्यात आलेल्या ‘फन’हित में जारी असणाऱ्या व्हिडीओमधील रहिवाश्यांच्या दिवसाची सुरुवात अशीच काहीशी झालीये. हा गदारोळ नक्की का चालू आहे याचा शोध घेत असताना ‘उबुंटू’मधील धमाल पोरापोरींनी “सण असाच धांगडधिंगा,कचरा करून साजरे करायचे असतात ना?” असा विचारलेला प्रश्न डोळ्यात झणझणीत अंजन घालत आहे.

गणरायाच्या आगमनाची ओढ भक्तांना लागलेली असताना सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होणारा हा‘व्हिडीओ’ “अति उत्साहात उत्सवाची मजा घालवू नका!” असा संदेश देत आहे.

‘स्वरूप रिक्रिएशन’ प्रस्तुत, ‘फेबल फॅक्टरी’ निर्मित‘उबुंटू’ या चित्रपटाद्वारे अभिनेता पुष्कर श्रोत्री चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. आगळेवेगळे नाव असलेल्या या चित्रपटाचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते असून शालिनी लक्ष्मण घोलप आणि ऑल इज वेल प्रोडक्शनने सहनिर्मिती केली आहे.

गणेशोत्सवाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी नामी शक्कल लढवणारी ‘उबुंटू’ मधील ही हुशार मुले येत्या१५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Web Title: Marathi movie Ubuntoo new funny videos esakal news