नये फूल कल फिर डगर में खिलेंगे... 

-अतुल क. तांदळीकर 
सोमवार, 1 जून 2020

योगेश यांच्या या गाण्यातील शब्दांना, त्यातील वेदनेला किशोरकुमारच न्याय देऊ शकतील हा विश्वास त्यांना होता आणि म्हणूनच हे गाणं त्यांनी वेगळ्या पध्दतीनेत्यांच्याकडून गाऊन घेतलं

सिने जगतात योगेश नावाचे गीतकार होते हे आजच्या पिढीला ठाऊक आहे की नाही माहित नाही पण कहीं दूर जब दिन ढल जाये,जिंदगी कैसी ये पहेली ही गाणी आज देखील आवडीने गुणगुणली जातात,त्या गाण्यांचे हे रचियता. लोकप्रियतेपासून दूर असलेल्या गीतकाराने काही मोजकीच गाणी लिहीलीत.त्यांचे नुकतेच निधन झाले हे तरी किती जणांना ठाऊक आहे हा प्रशनच आहे कदाचित ही गाणी ऐकल्यावर जीवनाला दिशा देणारं गाणं वाचल्यावर तरी ते लक्षात रहावेत... 

 

हे गाणं तसं ऐकलंकीच समजून जातं. त्यात खुप सोपी भाषा आणि उमजणारे शब्द आहेत.पण ते राजेश रोशन या गुणी संगीतकाराने हे इतके छान स्वरबधद केलेय की, त्यामुळे मनात रेंगाळत.सहसा किशोर कुमार यांची गाणी आपण त्यांच्या नेहमीच्या शैलीत ऐकतो,ती भावतात आणि ओठांवर सारखी रूळतात देखील,पण मूळातच हळव्या मनाच्या किशोरकुमारकडून अगदी वेगळ्या आवाजात गाऊन घेण्याची कमाल या संगीतकाराने केल्यामुळे हे आपल्या जगण्यातील अनेक संघर्ष टप्पे,सुख-दु:ख,आशा-निराशा अशा अवस्थांची जाणीव करून देत राहतं. 

 
किशोरदांचा रूहानी आवाज 

किशोर कुमार यांनी गाणी अनेक गायली आहेत. त्यात त्यांचा आवाज नेहमीच त्या गीतातील भावनांशी जुळणारा आहे,दर्द असेल तर दर्द, आनंद असेल तर आनंद आणि विनोद असेल तर विनोद त्यातून झळकलेला आपण बघतो.दर्द असलेल्या गाण्यांचे उदाहरणच द्यायचे झाले तर, घुंगरू की तरहा बजता ही रहां हुँ मै..किंवा चिंगारी कोई भडके..जिंदगी का सफ़र,मै तेरा शहर छोड जाऊंगा आदि गाणी ऐका, हा गायक अगदी वेगवेगळया रूपात समोर येत असतो. त्याच्या आवाजातील दर्द,त्या दु:खद भावना,त्या-त्या संगीतकारांनी आपापल्यापरीने त्यांच्याकडून गाऊन घेतल्या आहेत. सगळ्या संगीतकारांचा हा म्हणूनच लाडका गायक होता आणि विशेष म्हणजे खुद्य 
संगीतकार देखील होता, त्यामुळे त्याला संगीताची आणि सुरातील लय,ताल,बारकावे याची जाण होती.आजच्या पिढीला देखील त्याची गाणी गुणगुणावी वाटतात यात सर्व आलं.या गाण्यातील त्यांचा रूहानी आवाज मनाला भावतो. 

मेलडी मेकर्स 
-राजेश रोशन यांची सूरमयी नजाकत 
-गीतकार योगेश यांची प्रतिभासंपन्न शैली 
-किशोरदांच्या वेगळ्या आवाजातील गाणं 

राजेश रोशन यांचं संगीत सिने जगतात अतिशय वेगळ्या धाटणीचं आहे. आपल्या संगीतसमूहातील साथीदारांकडील वाद्यांचा आणि कोरसचा उपयोग चातूर्याने करीत भारतीय रागदारीला त्यांनी एक वेगळं सौंदर्य बहाल केलं.शब्दांची नजाकत आणि त्यावर सुरांचं कोंदण यामुळे त्यांची 
गाणी देखणी आहेत,अन्य लोकप्रिय गाण्यांच्या गर्दीत ती वेगळी वाटतात. तुमसे बढकर दुनिया में,तेरे जैसा यार कहां,दिल क्‍या करे जब किसीको,परदेसियां ये सच है पिया,कहो ना प्यार है,इत्यादिंचा यात समावेश करता येईल. 

योगेश यांच्या या गाण्यातील शब्दांना, त्यातील वेदनेला किशोरकुमारच न्याय देऊ शकतील हा विश्वास त्यांना होता आणि म्हणूनच हे गाणं त्यांनी वेगळ्या पध्दतीनेत्यांच्याकडून गाऊन घेतलं.दु:ख पण त्यातही आशेचं प्रतिबिंब असलेल्या योगेश यांच्या भावना या दोघा गुणी लोकांनी अजरामर केल्यात.अगदी शांतसमयी डोळे मिटून हे गाणं ऐका बघा काय फील येतो तो...तुम्हाला नक्‍की पटेल हा गीतकार मजरूह,साहिर,इंदीवर,हसरत,आनंद बक्षी यांच्या पंक्‍तीत असायला हवा होता. पण लोकप्रियतेचा हव्यास नसलेल्या या गीतकाराला ते भाग्य लाभलं नाही हे आपलं दुर्देव.त्यांची गाणी मात्र खुप छान एवढच काय ते समाधान. 

कहॉं तक ये मन को अंधेरे छलेंगे 
उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे 

आधी सांगितल्या प्रमाणे सोप्या शब्दातील या ओळीत उलगडून सांगण्यासारखं काही नाही.आपल्या मनाची कधी होणारी अशी अवस्था आणि त्यावरचा हा उपाय, आपण देखील तो अनुभवलेला.हे कोणीही कबूल करेल.त्याहीपेक्षा किशोरदांच्या रूहानी आवाजात ते मनोमन पटतं. 

कभी सुख कभी दुख, यही जिंदगी हैं 
ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी हैं 
नये फूल कल फिर डगर में खिलेंगे 

जीवन नेमकं आहे तरी काय कधी सुख आणि कधी दु:ख.या अवस्थेतून जातांना आपल्या जीवनमार्गक्रमणेत हा अनुभव कोणाला चुकला नसेलच. 

भले तेज कितना, हवा का हो झोंका 
मगर अपने मन में तू रख ये भरोसा 
जो बिछड़े सफ़र में तुझे फिर मिलेंगे 

खचलेल्यांच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या या ओळी नक्‍कीच प्रेरक आहेत, यात संदेह नाही.गीतकार योगेश यांच्या निधनानिमित्त ही शब्दसुमनांजली. 
tandalikar.atul@rediffmail.com 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi newes jalgaon bollywood Lyricist yogesh death by Shabdasumananjali.