आता डाकू सुशांत सिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

"ए म.एस. धोनी' चरित्रपट असो किंवा "राबता'सारखी फिक्‍शन फिल्म अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता त्याचा आगामी चित्रपट "सोन चिरैया'मधील लूक नुकताच उघड झाला. या चित्रपटात तो चंबळ खोऱ्यातील डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटातील लूकची तुलना "शोले'च्या गब्बरशी होत आहे. या भूमिकेसाठीही तो खूप मेहनत घेतो आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याने त्याची म्हणे लाईफ स्टाईलच बदलली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो सकाळी उठल्यानंतर अंथरूण आवरून झाल्यानंतर पंधरा मिनिटांचा वर्कआऊट करतो.

"ए म.एस. धोनी' चरित्रपट असो किंवा "राबता'सारखी फिक्‍शन फिल्म अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता त्याचा आगामी चित्रपट "सोन चिरैया'मधील लूक नुकताच उघड झाला. या चित्रपटात तो चंबळ खोऱ्यातील डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटातील लूकची तुलना "शोले'च्या गब्बरशी होत आहे. या भूमिकेसाठीही तो खूप मेहनत घेतो आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याने त्याची म्हणे लाईफ स्टाईलच बदलली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो सकाळी उठल्यानंतर अंथरूण आवरून झाल्यानंतर पंधरा मिनिटांचा वर्कआऊट करतो. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करतो आणि आपल्या आवडत्या म्युझिकवर मेडिटेशन करतो. दिवसाची सुरुवात तो चहा पिऊन करतो ज्याला तो "सुपरमॅन टी' म्हणतो. ही चहा ब्लॅक टी आणि ग्रीन टीचं मिश्रण असतं आणि ज्यात हळद आणि आलंही टाकतो. आता हा सगळा बदल या चित्रपटासाठी केला आहे की स्वतःसाठी, हे अद्याप समजलेलं नाही. मात्र त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत हे नक्की! 

Web Title: marathi news bollywood sushant singh rajput