सलमानला दिलेल्या धमकीमुळे 'रेस 3'चे शुटींग थांबले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबई - काही दिवसांपुर्वीच बातमी आली होती की सलमान खान ला जीवानीशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा परीणाम म्हणून सलमानच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे आणि सलमानचा आगामी सिनेमा असलेल्या 'रेस 3'चे शुटींग थांबवण्यात आले आहे. 

सलमानच्या घराभोवतीची सुरक्षाही वाढली आहे. काही दिवसांपुर्वीच 'रेस 3'च्या शुटींग दरम्यान काही अज्ञात लोक सिनेमाच्या सेटवर घुसले होते आणि सिनेनाचे शुटींग थांबवण्याची मागणी केली होती. सेटवर येऊन सलमानला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या सर्व प्रकारानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिस या सर्व प्रकाराची चौकशी करत आहे. 

काही दिवसांपुर्वी सलमानला जोधपुर मधील कुख्यात गँगस्टर लॉरेंस विश्नोई ने जीवानीशी मारण्याची खुलेआम धमकी दिली होती. जोधपुर मध्येच सलमानला मारुन टाकेन, अशी धमकी जोधपुर कोर्टात एका खटल्याच्या दरम्यान लॉरेंसने पोलिसांच्या ताब्यात असतानाच मिडीया समोर बोलताना दिली होती. 1998 मध्ये 'हम साथ साथ है'च्या शुटींगच्या वेळी जोधपुर मधील कांकणी गावात सलमान वर दोन काळे काळवीट मारण्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सलमानवर खटला देखील चालला. या खटल्यानंतर विश्नोई समाजातील लोक सलमानचे शत्रु बनले आहेत. कारण या समाजात काळवीटाचे घरातील लहान मुलांप्रमाणे पालन पोषण केले जाते. ही त्यांची परंपरा आहे. त्यामुळे या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. म्हणून सलमानला लॉरेंस विश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

Web Title: marathi news entertainment actor salman khan race movie