बबन चित्रपटातून सिमा समर्थ यांचे अभिनयात पदार्पण

seema-samarth
seema-samarth

जुनी सांगवी - येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापकपदी कार्यरत असणाऱ्या सीमा समर्थ बँकेची जबाबदारी सांभाळत स्वत:तील अभिनय कलेच्या माध्यमातुन 'बबन' या मराठी चित्रपटातून 'आत्ता आजी' म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. नोकरीतुन निवृत्तीसाठी काही महिने शिल्लक असताना त्यांना राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ख्वाडा या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याकडुन गावठी आजीच्या भुमिकेसाठी विचारणा झाली. आणि त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली.   

दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांच्या 'बबन' या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एक आव्हान म्हणून मी ती स्वीकारले असे त्या सांगतात. या बद्दल बोलताना सीमा समर्थ सांगतात, ''अभिनय ही माझी पहिली आवड. मात्र, मी १९८१ पासून बँकेत कार्यरत आहे. सुरुवातीला मी आकाशवाणी, मग दूरदर्शनवर छोटी-मोठी कामे केली आहेत. मात्र, चित्रपटात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. बँकिंग क्षेत्रातील करिअरमधून रिटायर होण्याच्या उंबरठ्यावर असताना भाऊराव कऱ्हाडे यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून मला चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली'', असे बँक शाखा व्यवस्थापक सीमा समर्थ यांनी सांगितले. 

त्या म्हणाल्या, ''आजपर्यंत मुंबईत बँकेत काम करीत होते. पण चित्रपटसृष्टीशी कधी संबंध आला नव्हता. अचानक माझी पुण्यात सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून बदली झाली''. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कर्‍हाडे यांना भेटण्याची इच्छा होती. बँकेचे एक खातेदार म्हणून मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. पण दुसर्‍या दिवशी ते स्वत: मला भेटायला आले. वारंवार बोलणे होत राहिले. एके दिवशी त्यांनी स्वत:च विचारले, तुम्हाला काम करायला आवडेल का ? तर ऑडिशनला या. क्षणभर गोंधळल्यासारखे झाले, परंतु, नंतर मी ऑडिशनला गेले. सिलेक्शनही झाले. भाऊरावांनी मला माझी चित्रपटातील भूमिका काय ते सांगितले. आणि तिथूनच बबन’ चित्रपटातील भूमिकेबाबत काम सुरु झाले.  
 
'बबन' चित्रपटात खेडे गावातील एका 'आजी'ची भूमिका करायची असल्याने तिथली मराठी भाषा आत्मसात करणे खूप कठीण काम होते. मात्र, भाऊरावांनी माझी भाषा सुधारण्यासाठी खूप कष्ट घेतले. वेगवेगळी पुस्तके वाचायला सांगितली. ग्रामीण भाषा, वावरण्यातला ग्रामीण ढंग येण्यासाठी शिरुरमध्ये एका कुटुंबाच्या घरी महिनाभर राहावे लागल्याचे सीमा समर्थ सांगतात. तिथल्या बायकांचे उठणे, बसणे, वागणे, साडी नेसणे, डोक्यावरचा पदर सांभाळण्याची पद्धत, जेवण्याची पद्धत, सहज येणार्‍या शिव्या शिकण्याबरोबरच शेतात जाऊन कांद्याची पात कापणे, खुरपणी, जनावरांच्या गोठ्यातील कष्टाची कामे करावी लागली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत चित्रपटात आजीची भूमिका सर्वोत्तम वठवायचीच, असा ठाम निर्धार मी केला होता.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com