प्रियाचा जलवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

काही दिवसांपासून एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका मल्याळम चित्रपटातील एक गाणं आणि त्या गाण्यातील प्रिया वरियार या अभिनेत्रीच्या डोळ्यांच्या अदांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या व्हिडीओमधील मुलगी नेमकी कोण आहे, हा प्रश्‍न सगळ्यांना पडलाच होता. तमीळ चित्रपट "ऊरू आदर लव्ह' यातील "मनिक्‍या मलयरा' हे गाणं प्रदर्शित झालं आणि या गाण्यातील अवघ्या काही सेकंदांचा असलेल्या भागाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. प्रिया या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नसून सहाय्यक अभिनेत्री आहे.

काही दिवसांपासून एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका मल्याळम चित्रपटातील एक गाणं आणि त्या गाण्यातील प्रिया वरियार या अभिनेत्रीच्या डोळ्यांच्या अदांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या व्हिडीओमधील मुलगी नेमकी कोण आहे, हा प्रश्‍न सगळ्यांना पडलाच होता. तमीळ चित्रपट "ऊरू आदर लव्ह' यातील "मनिक्‍या मलयरा' हे गाणं प्रदर्शित झालं आणि या गाण्यातील अवघ्या काही सेकंदांचा असलेल्या भागाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. प्रिया या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नसून सहाय्यक अभिनेत्री आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या गाण्याला लाखो लाईक्‍स आणि व्ह्यूज मिळाले. एवढंच नव्हे; तर काही तासांत प्रियाच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे फॉलोअर्सही काही हजारोंच्या घरात गेले. प्रियाच्या या व्हिडीओमुळे तिला बॉलीवूडच्या ऑफर्सही येऊ लागल्या आहेत. "पिंक' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी प्रियाला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी विचारले. पण प्रियाला तिच्या पहिल्या चित्रपटावरच सध्या लक्ष केंद्रित करायचं असल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने ही गोष्ट स्पष्ट केली. आता सध्या विविध स्वरूपात प्रियाच्या गाण्याचा व्हिडीओ एडी करून अपलोड करण्याचा ट्रेंडच सुरू केलाय नेटकऱ्यांनी. त्यामुळे कोण प्रिया, असा प्रश्‍न पडण्यापूर्वी "ऊरू आदर लव्ह' या सिनेमाचा ट्रेलरही दिग्दर्शकांनी नुकताच प्रदर्शित केलाय. प्रियानेही स्वतःच स्वतःचे काही व्हिडीओ यू-ट्युबवर अपलोड केले आहेत. असो. त्यामुळे प्रिया गेले काही दिवसात "इंटरनेट सेन्सेशन' बनली आहे. 

Web Title: marathi news entertainment news priya prakash warrier