अमृता सुभाषची "कट्टी बट्टी' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

"झी युवा'वर लवकरच "कट्टी बट्टी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता सुभाष एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती अभिनय करत नसून तिने या मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे. इतकंच नव्हे; तर या शीर्षकगीताला तिने संगीतही दिलं आहे. अमृता सुभाष आणि स्वानंद किरकिरे यांच्या स्वरसाजात हे शीर्षकगीत सजलंय. या अनुभवाबाबत अमृता म्हणाली की, ""एखाद्या मालिकेचं शीर्षकगीत गाण्याचा, ते संगीतबद्ध करण्याचा आणि स्वानंदसोबत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. स्वानंद आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हापासून स्वानंदनी माझ्यातील गाण्याचं कौशल्य हेरलं आहे.

"झी युवा'वर लवकरच "कट्टी बट्टी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता सुभाष एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती अभिनय करत नसून तिने या मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे. इतकंच नव्हे; तर या शीर्षकगीताला तिने संगीतही दिलं आहे. अमृता सुभाष आणि स्वानंद किरकिरे यांच्या स्वरसाजात हे शीर्षकगीत सजलंय. या अनुभवाबाबत अमृता म्हणाली की, ""एखाद्या मालिकेचं शीर्षकगीत गाण्याचा, ते संगीतबद्ध करण्याचा आणि स्वानंदसोबत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. स्वानंद आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हापासून स्वानंदनी माझ्यातील गाण्याचं कौशल्य हेरलं आहे. त्यामुळे "कट्टी बट्टी'चं शीर्षकगीत गाताना मला खूप छान वाटलं आणि मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे.'' 
 

Web Title: marathi news marathi movie amruta subhash

टॅग्स